प्रशिक्षण

आर. सी. पटेल संकुलातील शिक्षकांचे तंत्रस्नेही प्रशिक्षण 



-----------------------------------------------------------------------------------------

" Activity Based Learning Workshop"

शिरपूर एज्युकेशन  सोसायटी संचलित प्राथमिक विभागातील पूर्व प्राथमिक
 व इयत्ता १ ली च्या शिक्षकांसाठी ABL कार्यशाळा आयोजित करण्यात आली .

                                      कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अध्यापन कसे करावे याबाबत श्रीमती ज्युलि थॉमस यांनी मार्गदशन केले. शिक्षकांनी स्वतः साहित्याची निर्मिती करून साहित्याचा वापर करावा. विद्यार्थ्यांना साहित्याची हाताळणी करू द्या असे ज्युलि थॉमस यांनी आपल्या मार्गदशनात सांगितले. पपेट शो, मॅजिक बॉक्स, ड्रामा, मॅजिक पेंटिंग, आदी बाबी कृतीयुक्त करून दाखवल्या.

                              कार्यशाळे प्रसंगी संस्थेचे संचालक श्री कमलकिशोर  भंडारी,शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. नीता सोनवणे ,संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा,ज्युलि थॉमस आदी उपस्थित होते.

                                         संस्थेतील १३० शिक्षकांनी   सदर कार्यशाळेचा लाभ घेतला. डॉ. नीता सोनवणे यांनी कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल  कौतुक केले. श्री कमलकिशोर भंडारी यांनी शिक्षकांना उद्बोधन करतांना सांगितले की प्राथमिक शिक्षण हे संस्काराचे वय आहे.शिक्षक जे करतील ते मुले करतात.  संस्काराच्या गोष्टी सांगितल्या जाव्यात.तसेचविद्यार्थ्यासाठी बक्षीस योजना जाहीर केली. यात प्रत्येक शाळेतील प्रथम तीन क्रमाकांना श्लोक स्पर्धेत अनुक्रमे ५०१, ३०१, २०१ रोख पारितोषिक देण्याचे जाहीर केले. शिक्षकांना ७०१ रु रोख बक्षीस देण्यात येईल.  कार्यक्रम सूत्रसंचालन श्री महेंद्र माळी यांनी केले.

ABL Workshop

***************-------------------------------****************

तंत्रस्नेही प्रशिक्षण

आर सी पटेल शैक्षणिक संकुलात तंत्रस्नेही प्रशिक्षण

दिनांक १७/०९/२०१७ वार रविवार रोजी आर सी पटेल मुख्य इमारत शिरपूर या ठिकाणी संकुलातील 
सर्व शाळांच्या तंत्रस्नेही शिक्षकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
 कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून
  शालेय पोषण आहार अधीक्षक श्री मनोहर वाघ, तंत्रस्नेही अशोक ढिवरे, गणेश सोनवणे 
यांचे मार्गदर्शन लाभले. 
ब्लॉग कसा तयार करावा, 
ब्लॉगमध्ये विविध प्रकारचे पेजेस पोस्ट कशाप्रकारे इन्सर्ट करावेत,
 शाळेतील विविध कार्यक्रमांचे फोटो
 शैक्षणिक व्हिडिओ ब्लॉगवर कसे अपलोड करावेत
या संदर्भात प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सी डी पाटील यांनी केले, 
तर आधार मुख्याध्यापक गणेश साळुंके यांनी मानले. 
या कार्यशाळेस सर्व सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.


" प्राथमिक शिक्षकांसाठी वर्कशीट कार्यशाळेचे आयोजन".

         
           शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक व पूर्व प्राथमिक शिक्षकांसाठी संस्थेने वर्कशीट कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेप्रसंगी  प्राचार्य ज्युलि थॉमस,मुख्याध्यापक गणेश साळुंके, महेंद्र परदेशी, रवींद्र खोंडे,आर.टी. भोई, बी.आर.महाजन,के.टी.जाधव, बी.बी.सोनवणे, पी.डी.कुलकर्णी, बी.एम.माळी,मनोज पाटील, गोपाल पाटील, सी.डी.पाटील, स्मिता पंचभाई, एलिजाबेथ जानवे आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक सी.डी.पाटील यांनी केले. गणेश साळुंके, महेंद्र परदेशी, बी.एम.माळी यांनी विविध विषयांवर शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्राचार्य ज्युलि थॉमस यांनी वर्कशीट बाबत विशेष मार्गदर्शन केले.यात वर्कशीट म्हणजे काय? प्राथमिक स्तरावर त्याची गरज काय याबाबत सविस्तर माहिती शिक्षकांना दिली. विविध विषयांचे वर्कशीट कसे तयार करावेत याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल,नगराध्यक्ष जयश्रीबेन पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक विभागासाठी नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यातील वर्कशीट अर्थातच स्वतंत्र विषयवार स्वाध्याय पुस्तक असण्याबद्दल मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा यांनी शिक्षकांना महत्त्व समजावून सांगितले. शिक्षकांनी स्व निर्मितीवर भर द्यावा असही डॉ.शर्मा यांनी मनोगतात व्यक्त केले. कार्यशाळेत प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाचे ऐंशी शिक्षकांचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश राजपूत यांनी केले. आभार जगदीश धनगर यांनी मानले.


बालवाड़ी वर्कशीट प्रशिक्षण









































No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा