क्षेत्र भेटी


क्षेत्रभेट

दिनांक २१/०६/२०१७ वार बुधवार 

इयत्ता 4 थी मधील विद्यार्थ्याचे क्षेत्रभेटीचे आयोजन केले गेले.  
आर. सी. पटेल फार्मसी कॉलेज शिरपूर या महाविद्यालयात "औषध व विविध प्रकारांचे कॉस्मेटिक"  उत्पादनांचा परिचय करुन देण्या‍त आला.
 येथील उत्पादनांचे 'MUSUME'  पाहून विद्यार्थी थक्क झाले.
 दैनंदिन जीवनात उपयोगी पडणा-या वस्तूंची निर्मीती शिरपूर येथे केली जाते हयाचे विद्यार्थ्यांना फारच आर्श्चय वाटले.











A.R.Patel C.B.S.E. School Shirpur या शाळेतील नाविन्यपूर्ण  "भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणिती प्रयोगशाळा"  यांना विद्यार्थ्यांनी भेट दिली. प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रज्ञांची, रसायनांची माहिती मुख्याध्यापक व शिक्षकांकडून जाणून घेतली.
 'मानवी सांगाडा' या मॉडेलविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या मनातील भिती दूर करण्यात आली.
 प्रयोगशाळेत लावलेल्या भारतीय शास्त्रज्ञांचे फोटो पाहून विद्यार्थ्यांचे मन चांगलेच भारावले. सर्वात शेवटी या शाळेतील विविध प्रकारची खेळणी खेळण्यात विद्यार्थी रंगून गेले.











दिनांक 29/08/2017 वार मंगळवार रोजी इयत्ता 4 थी वर्गातील 215 विद्यार्थ्यांनी 
शिरपूर शहराच्या मुख्य पोष्ट ऑफिसला भेट दिली. 
पोष्टाचा कारभार कसा चालतो ते प्रत्यक्ष अनुभवले.  
पत्राचा प्रवास कसा होतो हे विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. 

पत्र पाठवणे, मनिऑर्डर करणे, वीज बीलाचे पैसे जमा करणे, ऑनलाईन शॉपिंगच्या वस्तू घरपोच उपलब्ध करुन देणे 

इत्यादी उपयोग सर्वसामान्य नागरीकास कशा प्रकारे होतात ते 
विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. 
यावेळी विद्यार्थ्यांनी पोष्टासंदर्भातले आपले अनुभव कथन केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी पोष्टासंदर्भातले आपले अनुभव कथन केले.









No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा