पुरावे

शाळा सिद्धी - पुरावे



क्षेत्र 1: समर्थक पुरावे

१. शाळेत हाती घेण्यात आलेल्या सर्व दुरुस्त्या / देखभाल.
2 क्रीडांगणाची शेवटी केलेली देखभाल.
३. विभिन्न पार्श्वभूमीतील सर्व विद्यार्थी यथार्थदर्शनाने विविध खेळ, शारीरिक, कला शिक्षण, कार्यानुभव आणि इतर सहशालेय उपक्रम यांसाठी उपलब्ध उपकरणे व साधने.
४. वर्गणी लावलेले वृत्तपत्रे, नियतकालिके, मासिके, साहित्य, ई-पुस्तके, डिजीटल साहित्य यांची यादी.
५. साठा, तालिका व दत्त नोंद पंजिका. (Issue Register)
६. विशेष ग्रंथालय /वेळापत्रकातील वाचन तासिकेची तरतूद.
७. आंतरजाल सुविधेसह संगणक.
८. वेळापत्रकात संगणक तासिकेचा भाग.
९. अर्हता धारक प्रयोगशाळा सहायक व शिक्षकांसह प्रयोगशाळा.
१०. सर्व उपलब्ध उपकरणे, अग्निशामके व प्रथमोपचार यांची यादी.
११. धोकादायक साहित्याची यादी. विद्युत उपकरणे, प्रयोगशाळेतील रसायने, शेगडी, गॅस शेगडी, स्वच्छता व उत्पादने.
१२. निकषांनुसार स्वच्छतागृहांची स्वच्छता व देखभाल.
१३. नळाच्या तोट्यांजवळ साबण/हस्तप्रक्षालन द्रवाची उपलब्धता.
१४. मागील वर्षी घेतलेल्या विविध क्रीडा /सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नोंदी.
१५. शुद्धीकरणासाठी तरतूद आणि पाण्याची टाकी /साठवणूक स्थळांची शेवटी केलेली सफाई.



क्षेत्र 2: समर्थक पुरावे 

१. विद्यार्थ्यांचे उपस्थिती पट.
2. विद्यार्थ्यांचे नमुन्या दाखल गृहपाठ, वर्गकार्य, परीक्षा प्रश्न - पत्रिका
३. अध्यापन - अध्ययनाबाबत शाळेच्या प्रमुखांनी, BRCs किंवा अन्य पर्यवेक्षकीय यंत्रणा याद्वारा देण्यात आलेल्या सुचनांच्या नोंदी.
४. शाळा प्रमुखांची शिक्षकांनी तयार केलेले पाठाचे नियोजन आणि प्रत्यक्ष अध्यापन याबाबतची निरिक्षणे.
५. अध्यापन - अध्ययन प्रक्रियेबाबत पालक आणि विद्यार्थ्यांसोबत झालेली आंतरक्रीया
६. विद्यार्थ्यांसोबत शाळा प्रमुखांच्या झालेल्या आंतरक्रीयेच्या नोंदी
७. शिक्षकांचे प्रशिक्षणांना उपस्थित असल्याचे पुरावे
८. पाठ नियोजन, अतिरिक्त पूरक मार्गदर्शन पुरावे
९. शिक्षक, विद्यार्थी यांनी प्रकाशित केलेला वार्षिकांक
१०. प्रकल्प नमुने, प्रयोग निरिक्षण नमुने, गृहपाठ नमुने, क्षेत्र भेटी अहवाल
११. विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तके
१२.  CCE नुसार संपूर्ण रेकॉर्ड
१३. दैनंदिन अध्यापनात समाजातील उपलब्ध विचारवंत, कलावंत यांच्या सहभागाचे पुरावे


क्षेत्र 3: समर्थक पुरावे 

१. विद्यार्थ्यांचे उपस्थिती पट
2. दिर्घकाळ अनुपस्थित असणारी मुले व त्यांच्या उपस्थित राहण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पुरावे.
३. अतिरिक्त पूरक मार्गदर्शन आवश्यक असणारी मुले रेकॉर्ड व कार्यवाही अहवाल
४. शाळेत घेतल्या गेलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांचा अहवाल.
५. विद्यार्थ्यांचे नमुन्यादाखल गृहपाठ, वर्गकार्य, परिक्षा प्रश्नपत्रिका.
६. अध्यापन - अध्ययन प्रक्रियेबाबत पालक आणि विद्यार्थ्यांसोबत झालेली आंतरक्रिया.
७. CCE नुसार संपूर्ण रेकार्ड.

क्षेत्र 4 : समर्थक पुरावे 

१. नियमावली/कर्तव्ये/जबाबदाऱ्यांची यादी
2. नवीन शिक्षकांसाठी पायाभूत कार्यक्रमांचा तपशील
३. शिक्षकांनी हजेरी लावलेली प्रशिक्षण कार्यक्रम /सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास
४. शिक्षकांची सरासरी उपस्थिती आणि शिक्षकांचे रजेचे अर्ज
५. अनुपस्थित शिक्षकांच्या वर्गाची पर्यायी व्यवस्था /बदली रजिस्टर
६. सर्व शिक्षक व कर्मचारी यांचा स्वमूल्यमापन अहवाल
७. वार्षिक नियोजनाच्या अभ्यासाचा भाग म्हणून शिक्षकांची स्वतःच्या कामगिरीची ध्येये
८. वर्षाच्या विविध काळातील पूर्ण करावयाच्या पाठ्यक्रमाची माहीती
९. शिक्षकांनी सेवेदरम्यान प्राप्त केलेली पात्रता
१०. शिक्षकांच्या कामगिरीवर अभिप्राय व सूचना
११. शाळा विकास आराखड्यातील शिक्षकांच्या विकासाच्या शाखा
१२. शिक्षकांनी हजेरी लावलेले सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम प्रमाणपत्रे
१३. पूर्वतयारी केलेले वेळापत्रक
१४. शिक्षकांना नेमून दिलेली कर्तव्ये/कामे दर्शविणारी कागदपत्रे



क्षेत्र 5 : शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन :  



१. शाळेची दृष्टी /हेतू घोषवाक्य प्रदर्शित केलेले /लिहिलेले /दस्तावेज
2. विकासाच्या नियोजनात सदस्यांना सहभागी करुन घेतल्याचे दस्तावेजीकरण
३. शाळा विकास आराखड्याची प्रत
४. शाळा विकास आराखडा तयार करणे. प्राधान्याचे क्षेत्र निवडणे, कृती कार्यक्रम नियोजन निर्माण करणे आणि उद्दिष्टपूर्ती गाठण्यासंबंधी वेळ व जबाबदाऱ्या ठरवून देणे इ. मध्ये सदस्यांचा समावेश केल्याचे दस्तावेजीकरण.
५. विकास आराखड्याची अंमलबजावणी केल्याचा नियमित मागोवा घेतला याचे दर्शक दस्तावेजीकरण.
६. शाळा व्यवस्थापन समिती बैठकांचे दस्तावेजीकरण
७. शाळेतील चालू कृती आणि प्रक्रिया सुधारण्याकरिता सर्व भागधारकांकडून सूचना मागविल्याची परिपत्रके.
८. शाळेतील शिक्षकांच्या प्रक्रियेचे स्व-मूल्यमापन : ज्यामध्ये शिक्षकांचे स्वयंमूल्यमापन, सहकाऱ्याकडून मूल्यमापन, शाळा प्रमुखांकडून मूल्यमापन, सदर बाबत चर्चा अहवाल ज्यावर सुधारणा करण्याकरिता शिक्षक सहमत असतील इ. चा समावेश असलेले दस्तावेजीकरण.
९. प्रत्येक विषयाच्या (पाठ टाचणात दस्तावेजीकरण केल्याप्रमाणे) प्रत्येक शिक्षकाकडे अभ्यासक्रमाच्या निकषांची आणि अभ्यासक्रमातील अपेक्षांची उपलब्धता.
१०. महिन्यांवर आधारित अध्ययनकर्त्यांच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचे अहवाल.
११. शिक्षकांकरवी सर्व शिक्षक-पालक सभांचे दस्तावेज. प्रत्येक अध्ययनकर्त्यांच्या कामगिरीबाबत टिप्पणी आणि पालकांसमवेत चर्चेतील उदयास आलेले मुद्दे इ. बाबतचे दस्तावेजीकरण.



क्षेत्र 6: समावेशन, आरोग्य आणि संरक्षण 



१. बालकांच्या सखोल पार्श्वभूमीसह प्रवेशावेळी घेतलेल्या नोंदी.
2. आरोग्य, स्वच्छता आणि समावेशनासंबंधी प्रकल्पांची यादी.
३. शिक्षकांनी शोधलेले विशेष गरजाधिष्ठीत बालकांसाठी आवश्यक बाबींची यादी.
४. विशेषगरजाधिष्ठीत बालकांसाठी आवश्यक आणि उपलब्ध असणारे अभ्यासक्रम साहीत्य, साधने यांच्या नोंदी.*
५.  पालकांचा सहभाग असणारे शालेय कार्यक्रम, उपक्रम, कृती यांची यादी.
६. बालकांशी गैरवर्तन, चांगला स्पर्श, वाईट स्पर्श इ. संवेदना, आरोग्य आणि सुरक्षा या विषयावर शाळेमध्ये जागृतीपर पोस्टर्स.
७.  शाळेमधील आपत्कालीन परिस्थितीला तोंड देणाऱ्या योजना.
८.  अध्ययनार्थी आणि पालक यांच्या चिंता आणि तक्रारी प्राप्त करण्याची तंत्रे, शाळेमध्ये उपलब्ध असणारी तक्रार पेटी.
९.  प्रत्येक अध्ययनार्थींच्या समुपदेशन सत्राच्या नोंदी.
१०.  बालकांच्या आरोग्य तपासणी नोंदी.
११.  बालकांच्या सुरक्षेसाठी आयोजिलेल्या उपक्रमांच्या नोंदी.
१२.  स्वच्छता पडताळणीच्या नोंदी.
१३.  स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा जागृतीपर आधारित कार्यक्रमाच्या नोंदी.


  क्षेत्र 7: उत्पादक समाजाचा सहभाग : 

१.  शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा विकास व्यवस्थापन समिती सदस्यांची यादी तयार करणे.
2.  बैठकीचे विषय आणि विषय पत्रिका.
३.  सदस्यांची उपस्थिती
४.  मागील बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा आणि झालेल्या कामाचा आढावा.
५.  शाळा विकास कार्यक्रम तयार करण्यासाठी चर्चा.
६.  शाळा मूल्यमापन, संनियंत्रण, अंमलबजावणी नियोजन यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा विकास व्यवस्थापन समितीचा सहभाग.
७.  शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा विकास व्यवस्थापन समिती सदस्यांना बैठकीस उपस्थित राहण्यासंबंधीत द्यावयाच्या सूचनांचे मार्ग. उदा. पूर्व सूचना.
८.  समाज सहभाग घेऊन अध्यापन - अध्ययन चे नियोजन.
९.  शाळेतील सुविधा सुधारणेसाठी समाजाचे सहाय्य.उदा. क्रीडांगणाचे सपाटीकरण, कुंपणाची भिंत, पिण्याचे पाणी, संगणक सुविधा, माहिती संप्रेषण सुविधा, ग्रंथालय, शाळेची बाग. इ.
१०.  शिक्षक गैरहजर असतांना विशिष्ट दिवशी गावातील प्रौढांव्दारे शाळेमध्ये पुढील कार्यक्रम आयोजित करणे, कथा सांगणे, स्थानिक कला, लोकगीत, संगीत, कला, कागदकाम, शेती करण्याच्या पद्धती, स्थानिक इतिहास.
११.  सामाजिक संस्था आणि स्थळे यांना भेटीचे आयोजन. उदा. ग्रामपंचायत, पोस्ट आॅफीस, शेती. इ.

No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा