"वेशभूषा व वार्षिक पारितोषिक वितरण समारोह संपन्न".
शिरपूर येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत वेशभूषा स्पर्धा व
वार्षिक पारितोषिक वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी महिला व बालकल्याण सभापती रंजनाताई सोनवणे, नगरसेविका आशाताई बागुल, माजी नगरसेवक दिलीप बोरसे,योग विद्याधाम संचालक डॉ.श्रीकांत वाडीले,ऍंड. ललेश चौधरी, ऍड. ज्ञानेश्वर थोरात, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय वरसाळे, साधन व्यक्ती मनोहर वाघ,सचिन जडिये, नितीन पाटील,उत्तम महाराष्ट्र विद्यापीठ सिनेट सदस्य अमोल सोनवणे, मुख्याध्यापक गणेश साळुंके, महेंद्र परदेशी, मनोज पाटील, गोपाल पाटील, रवींद्र खोंडे,विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील
आदी उपस्थित होते.
वेशभूषा कार्यक्रमात शाळेतील ६१
विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा सादर केल्या यात बालवाडी ते चौथी वर्गातील
विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
प्रत्येक वर्गातून प्रथम क्रमांक काढण्यात आला. सदर प्रथम येणाऱ्या
विद्यार्थास सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरणाची संधी देण्यात येणार आहे. वेशभूषा परीक्षण विवेकानंद ठाकरे व ज्वाला मोरे यांनी केले.
वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात इयत्ता बालवाडी ते चौथी
वर्गातील विविध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात
आले.
सदर कार्यक्रमात चारशे ऐंशी
विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा घेण्यात आल्या.त्यासाठी संस्थेचे
संस्थापक अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल,उपाध्यक्ष राजगोपाल भंडा री यांनी
बक्षीस योजनेसाठी भरीव आर्थिक मदत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक
सी.डी.पाटील यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी मिशन स्वच्छ
विद्यालय अंतर्गत शिरपूर वरवाडे नगरपालिके तर्फे स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त
झाल्याचे सांगितले.तसेच शिक्षकांनी स्वखर्चाने डिजीटल वर्ग केल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र माळी,गजेंद्र जाधव यांनी केले.आभार अविनाश राजपूत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश सोलंकी, जगदीश धनगर, संदीप चौधरी, गोपाल न्हावी,सुभाष भिल, प्रकाश ईशी,योगेश बागुल, मोहिनी सोनवणे, स्मिता साळुंखे, वंदना सोनवणे, बबिता काटोले, रेखा माळी,श्वेता चौधरी यांनी परिश्रम घेतले.