"स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता रॅलीचे आयोजन."
शिरपूर येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळा शिरपूर शाळेत स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. औपचारिक कार्यक्रम प्रसंगी आरोग्य सभापती सलीम खाटीक, कोऑरडीनेटर तेजस्विनी मानकर,महेंद्र परदेशी, गणेश साळुंखे,विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील, जगदीश सोलंकी, रमेश शिरसाठ, सुभाष भिल आदी उपस्थित होते. मिशन स्वच्छ विद्यालय बाबत मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी मार्गदर्शन केले. समाजात स्वच्छता बाबत जनजागृती व्हावी यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला.रॅलीतून स्वच्छ शहर,सुंदर शहर अशी वाक्ये वदवून गल्लीतुन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव जागृती करिता शालेय स्तरावर दोन गटातून चित्र रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.इयत्ता १ ली व २ री ,३ री व ४ थी या गटातून अनुक्रमे प्रथम दोन क्रमांक काढण्यात आले.दोन गटात घेतलेल्या स्पर्धेत कचरा ,कचरा पेटीत टाकणारा मुलगा,साफसफाई करणारा मुलगा अशी चित्रे विद्यार्थ्यांना रंगविण्यासाठी देण्यात आली.सूत्रसंचालन गजेंद्र जाधव यांनी केले. आभार संदीप चौधरी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेंद्र माळी, अविनाश राजपूत,गोपाल न्हावी, जगदीश धनगर , भिल,यांनी परिश्रम घेतले.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"संविधान दिवस"
शिरपूर येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळा शिरपूर शाळेत संविधान दिवस उत्साहात साजरी करण्यात आला. या औपचारिक कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील, ज्येष्ठ शिक्षिका सौ. आर. डी. माळी, श्रीमती एम. आर. सोनवणे, सौ. स्मिता साळुंखे, सौ. वंदना सोनवणे, श्री. जगदीश सोलंकी, श्री. रमेश शिरसाठ, श्री. प्रकाश ईशी आदी उपस्थित होते. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्याकडे संविधान सुपुर्द केले. तो दिवस भारतभर सर्वत्र संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मुख्याध्यापक श्री. सी. डी. पाटील यांनी संविधानातील मार्गदर्शक तत्वे समजावून सांगितले. यात न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आदी महत्वपूर्ण गोष्टीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संविधानाचे महत्त्व श्री. अविनाश राजपूत यांनी विषद केले. स्वातंत्र्यानंतर भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र होणार,प्रजा हितासाठी संविधान ही एक उत्तम नियमावली आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांची संविधानिक जबाबदारी निश्चित करण्यात आली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संविधान दिनाचे औचित्य साधून इयत्ता दुसरीतील अनार्य भुषण बछाव या विद्यार्थ्याने गोष्टीचे पुस्तक शाळेला भेट म्हणून दिले. विद्यार्थ्यांकडून संविधानतेची शपथ देण्यात आली. सूत्रसंचालन व आभार श्री. गजेंद्र जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. महेंद्र माळी, श्री. गोपाल न्हावी, श्री. जगदीश धनगर , श्री. योगेश बागुल , श्री. अनिल माळी, श्री. संदीप चौधरी , श्री. सुभाष भिल यांनी परिश्रम घेतले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
राष्टीय एकता दिवस
" बॅ. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस."
शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर शाळेत सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती "राष्ट्रीय एकता दिवस" म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक सी.डी. पाटील, सौ. आर.डी. माळी, सौ. एम.आर.सोनवणे, श्रीमती बी. बी. काटोले, श्री. रमेश शिरसाठ आदी उपस्थित होते. राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त शाळेत विवध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय एकसंघतेसाठी केलेले कार्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जगदीश सोलंकी यांनी केले. तर आभार श्री. प्रकाश ईशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. महेंद्र माळी, श्री. अविनाश राजपूत, श्री. गजेंद्र जाधव, श्री. सुभाष भिल, श्री. संदीप चौधरी,श्री. अनिल माळी, श्री. गोपाल न्हावी, श्री. जगदीश धनगर, श्री. योगेश बागुल यांनी परिश्रम घेतले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------विद्यार्थी दिवस
आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी दिवसम्हणून साजरी करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक श्री. सी. डी. पाटील, सौ. आर.डी. माळी, सौ. एम.आर.सोनवणे, श्रीमती बी.बी.काटोले, श्री. रमेश शिरसाठ आदी उपस्थित होते. दि.७ नोव्हेंबर १९०० रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथील शाळेत प्रथम प्रवेश निमित्ताने विद्यार्थी दिवस साजरी करण्यात आला. प्रथम प्रवेश दिनानिमित्त विवध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय एकसंघतेसाठी केलेले कार्य भारतीय संविधान या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र माळी यांनी केले. श्री. जगदीश सोलंकी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. तर आभार श्री. प्रकाश ईशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी, श्री. अविनाश राजपूत, श्री. गजेंद्र जाधव, श्री. सुभाष भिल, श्री. संदीप चौधरी, श्री. अनिल माळी, श्री. गोपाल न्हावी, श्री. जगदीश धनगर, श्री. योगेश बागुल यांनी परिश्रम घेतले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती
२ ऑक्टोंबर भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती
आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. सौ. नीता सोनवणे यांनी भुषविले, शिरपूर नगरपरिषदेचे आरोग्य सभापती श्री. सलीम भाई व नगरसेवक श्री. चंद्रकांत सोनवणे, एच. आर. पटेल मराठी कन्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. गणेश साळुंखे व सी. डी. पाटील सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी इयत्ता ३ री व ४ थी मधील राजपूत वेदांत रमेश, सोनजे क्रिश, चेतश्री राजेश कुलकर्णी, बोरसे कृतिका रवींद्र या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल भाषणे दिली. विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्स्फूर्त भाषणांचा प्रभाव मान्यवरांवर झाला व श्री चंद्रकांत सोनवणे आणि सलीमभाई यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येकी शंभर रुपयांचे रोख पारितोषिक दिले. शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका खैरणार मॅडम यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील विविध रोचक प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सौ. नीता सोनवणे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या मौलिक विचारांचे आचरण विद्यार्थ्यांनी करावे, थोर व्यक्तींचा बाणा, तत्त्व अंगीकारून तो चिरकाल टिकवावा असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी विविध घोषणांमधून स्वच्छतेचा संदेश शिरपूर शहरातील नागरिकांना दिला. शाळेच्या मुख्य इमारतीपासून आदर्शनगर या परिसरामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम एच. आर. पटेल मराठी कन्या प्राथमिक शाळा व आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या दोन्ही शाळांनी सयुक्त आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोपाल न्हावी सर तर आभार प्रदर्शन श्री प्रकाश ईशी सर यांनी केले.या कार्यक्रमाचे व रॅलीचे यशस्वीपणे आयोजन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सी.डी. पाटील सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शिक्षक दिवस
" शिक्षक दिनानिमित्त शाळेला मिळाली पुस्तकांची भेट ."
" शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर येथे
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन
म्हणून साजरी करीत विविध कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी कृषी विस्तार अधिकारी योगेश पाटील, मुख्याध्यापक भटू माळी,मनोज पाटील, भीमराव महाजन,आर.व्ही.सूर्यवंशी, सिप अबॅकसचे संचालक जयेश शहा विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील,शिक्षक आदी उपस्थित होते.
इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारीत वक्तृत्व सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.डी. पाटील यांनी केले.
शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील शिक्षकांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
पालक कृषी विस्तार अधिकारी योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे धडे मिळावेत यासाठी सुमारे सात हजार रुपये किंमतीची पुस्तके शाळेला भेट केली.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून सिप अबॅकस मार्फत घेण्यात आलेल्या ऑल इंडिया अरेथमेटिक्स जिनियस काँटेस्ट राउंड दोन मधील १५ विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन अविनाश राजपूत यांनी केले.तर आभार महेंद्र माळी यांनी मानले.
कार्यक्रम प्रसंगी पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश सोलंकी,संदीप चौधरी, गोपाल न्हावी,प्रकाश ईशी, गजेंद्र जाधव, रमेश शिरसाठ, जगदीश धनगर,योगेश बागुल, अनिल माळी,सुभाष भिल यांच्यासह संदीप पाटील, सागर पवार ,सतिष पाटील,यशोदा पाटील यांनी परिश्रम घेतले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लोकमान्य टिळक पुण्यतिथी :- वक्तृत्व स्पर्धा
" लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत एकपात्री अभिनयाने कुमार वेदांत राजपूत याने विद्यार्थ्यांना केले मंत्रमुग्ध"
" शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर.सी.पटेल प्राथमिक शाळा, शिरपूर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर अण्णाभाऊ जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली.
कार्यक्रम प्रसंगी विद्यमान नगरसेविका सौ.रंजनाताई सोनवणे ,श्री महेंद्र परदेशी ,श्री अमोल सोनवणे,पालक प्रतिनिधी सौ. पौर्णिमा राजपूत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सी.डी. पाटील आदी उपस्थित होते.
इयत्ता ४ थी वर्गातील कुमार वेदांत राजपूत याने लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत
" मी टिळक बोलतोय "
एकपात्री नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
" मी टिळक बोलतोय "
एकपात्री नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
सदर स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.प्रथम गट :बालवाडी ते २ री द्वितीय गट: ३ री व ४ थी.
प्रथम गटात ६० तर द्वितीय गटातून ६८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
इयत्तनिहाय प्रथम दोन क्रमांक काढण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देण्यात आली.
श्री अविनाश राजपूत व श्रीमती वंदना सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विदयलयाचे मुख्याध्यापक श्री सी.डी. पाटील यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना धाडसी होण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात श्री महेंद्र परदेशी यांनी विद्यार्थ्यांना टिळकांच्या धाडसी जीवन प्रवासा बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम सूत्रसंचालन श्री गजेंद्र जाधव व श्री प्रकाश ईशी यांनी केले.
आभार श्री अनिल माळी यांनी मानले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा