सांस्कृतिक कार्यक्रम
सांस्कृतिक
ज्ञानरूपी झाडाची पाने
बहरती वने मने
"आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी , ग्रंथदिंडी व वृक्षा रोपण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन."
दि.३ जुलै २०१७ वार:सोमवार रोजी आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा,शिरपूर शाखेत आषाढी एकादशी निमित्त वृक्षारोपण,ग्रंथदिंडी व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी मा. नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल ,गटशिक्षणाधिकारी श्री पी.झेड.रणदिवे,बांधकाम सभापती सौ.संगीताताई देवरे ,मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.उमेश शर्मा ,प्राचार्य पी.व्ही.पाटील,मुख्याध्यापक गणेश साळुंके, विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षा सौ जयश्रीबेन पटेल यांनी वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे पूजन करून औपचारिक उद्घाटन केले.
गटशिक्षणाधिकारी पी.झेड रणदिवे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यानी वारकरी वेशभूषा साकारली.
दिंडीत विद्यार्थ्यानी वृक्ष लागवड व ग्रन्थ पूजन ,वाचन ,साक्षरतेचा संदेश दिला.
विठ्ठल रुक्मिणी यांची देखणी वेशभूषा विद्यार्थ्यानी साकारली.
वृक्षदिंडीत ५०० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप चौधरी, गोपाल न्हावी, गजेंद्र जाधव,एस.के.भिल,जगदीश सोलंकी,अविनाश राजपूत ,रमेश शिरसाठ ,जे.एम.धनगर ,पूनम सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
गुरु पौर्णिमा
संपूर्ण भारतभर गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. फार पूर्वी अगदी पुरातन काळात आपल इथे आश्रम गुरुकुल पद्धत होती. गुरूंकडून विद्या घेण्यासाठी विद्यार्थी स्वत: गुरुकुलातच राहात असत. गुरूला पिता तर गुरुपत्नीला माता समजत. म्हणजे त्या शिष्यांच्या जीवनात गुरूंना एक अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान होते. अशी अनेक गुरुकुल त्या काळात होती आणि अनेक हुशार-पंडित-तत्त्वज्ञानी विद्यार्थी त्यातून घडले अन् जगाला आदर्श ठरले. युगानुयुगे ही गुरु-शिष्याची परंपरा सुरूच आहे. अगदी ज्ञानेश्वरांच्या काळातदेखील एवढा मोठा योगी चांगदेव पण त्यने लहानग्या मुक्ताईला गुरू मानले. इथे वयाचा संदर्भ जोडताच येत नाही. येतो प्रश्न तो ज्ञानाचा. व लहान असूनही जर जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं पांडित्य जर एखाद्यात असेल तर मग त्याला गुरूच म्हणावं लागेल. म्हणजेच जीवनाचं तत्त्वज्ञान ज्याच्याकडून शिकायला मिळतं तो म्हणजे गुरू.

" लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत एकपात्री अभिनयाने कुमार वेदांत राजपूत याने विद्यार्थ्यांना केले मंत्रमुग्ध"
" शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर.सी.पटेल प्राथमिक शाळा, शिरपूर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर अण्णाभाऊ जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली.
कार्यक्रम प्रसंगी विद्यमान नगरसेविका सौ.रंजनाताई सोनवणे ,श्री महेंद्र परदेशी ,श्री अमोल सोनवणे,पालक प्रतिनिधी सौ. पौर्णिमा राजपूत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सी.डी. पाटील आदी उपस्थित होते.
इयत्ता ४ थी वर्गातील कुमार वेदांत राजपूत याने लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत
" मी टिळक बोलतोय "
एकपात्री नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
सदर स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.प्रथम गट :बालवाडी ते २ री द्वितीय गट: ३ री व ४ थी.
प्रथम गटात ६० तर द्वितीय गटातून ६८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
इयत्तनिहाय प्रथम दोन क्रमांक काढण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देण्यात आली.
श्री अविनाश राजपूत व श्रीमती वंदना सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विदयलयाचे मुख्याध्यापक श्री सी.डी. पाटील यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना धाडसी होण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात श्री महेंद्र परदेशी यांनी विद्यार्थ्यांना टिळकांच्या धाडसी जीवन प्रवासा बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम सूत्रसंचालन श्री गजेंद्र जाधव व श्री प्रकाश ईशी यांनी केले.
आभार श्री अनिल माळी यांनी मानले.
रक्षाबंधनानिमित्ताने झाडांना राखी बांधून चिमुकल्यांनी दिला "झाडे वाचवा" चा संदेश.
" शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर.सी.पटेल प्राथमिक शाळा, शिरपूर
येथे रक्षाबंधन सणा निमित्ताने " राखी बनवण्याची स्पर्धा " यशस्वीपणे संपन्न झाली.
कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सी.डी. पाटील व शिक्षक उपस्थित होते.
सदर स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.
प्रथम गट :१ ली व २ री
द्वितीय गट: ३ री व ४ थी.

प्रथम गटात १३५ तर द्वितीय गटातून १४१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
इयत्तनिहाय प्रथम दोन क्रमांक काढण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी श्रीमती स्मिता साळुंखे व श्रीमती बी.बी.काटोले यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाबद्दल मार्गदर्शन केले. भारतीय संस्कृती व वैविध्यपूर्ण असणारे सण आपल्यावर संस्कार करतात.असे स्मिता साळुंखे यांनी मार्गदर्शनात सांगितले.
यावेळी इयत्ता ४थी च्या विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविला यात त्यांनी शालेय परिसरातील सर्वाधिक जुने वृक्षराजाला मोठी राखी बांधून झाडे वाचवा असा संदेश परिसरातील नागरिकांना दिला.
झाडांचे महत्त्व सर्वांनी जाणावे अस या चिमुकल्यांना वाटत हॊते.
यावर्षी देखील पावसाचे प्रमाण कमी असल्याने झाडांची होणारी कत्तल थांबावी. या उद्देशाने विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली.
गजेंद्र जाधव,गोपाळ न्हावी,सुभाष भिल,संदीप चौधरी, महेंद्र माळी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
वर्गावर्गातून मुलींनी वर्गातील बंधूंना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली.
"श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडीचे यशस्वी आयोजन"
" शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी मा.नगरसेवक दिलीप बोरसे ,पालक प्रतिनिधी भूषण पाटील,सुनिल साळुंखे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील,शिक्षक आदी उपस्थित होते.
इयत्ता बालवाडी वर्गातील छोट्या बालमित्रांनी श्रीकृष्णाची वेशभूषा सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.डी. पाटील यांनी केले.
सूत्रसंचालन महेंद्र माळी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश सोलंकी,संदीप चौधरी, अविनाश राजपूत, गोपाल न्हावी,प्रकाश ईशी, गजेंद्र जाधव, रमेश शिरसाठ, जगदीश धनगर,योगेश बागुल, शुभांगी बाविस्कर, संगिता चव्हाण, अर्चना जोशी,व्ही.डी तांबोळी यांनी परिश्रम घेतले.

बैल पोळा - अनुभव कथन
बैल पोळा हा सण कसा साजरा केला
अनुभव कथन करतांना
इयत्ता 1 ली वर्गातील
चिमुकले विद्यार्थ्यी
बैल पोळा हा सण कसा साजरा केला
अनुभव कथन करतांना
इयत्ता 1 ली वर्गातील
चिमुकले विद्यार्थ्यी
नवरात्र उत्सव - वेशभूषा व दांडिया रास नृत्य
आज दिनांक २९/०९/२०१७ रोजी आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत नवरात्र उत्सवानिमित्ताने 'वेशभूषा व दांडिया नृत्य स्पर्धा' आयोजित करण्यात आली. शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. संगीताताई देवरे बांधकाम सभापती शिरपूर नगरपरिषद व लाइन्स क्लबच्या सदस्या सौ. रत्नप्रभा सोनार यांच्या हस्ते झाला. यावेळी आर. सी. पटेल कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गणेश साळुंके सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री. सी. डी. पाटील सर उपस्थित होते. शाळेच्या वतीने छात्र शिक्षिकांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. सौ. भारतीय गिरासे, श्रद्धा पाटील, दीपिका पाटील व अश्विनी पाटील यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. महेंद्र माळी सर यांनी सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची प्रतिमा शाळेस भेट दिली तिचाही अध्यक्षांच्या हस्ते स्वीकार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. संगीताताई देवरे यांनी उपस्थित सर्व बाल चिमुकल्यांचे खूप खूप कौतुक केले. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळा विविध उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देते याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे आभार मानले. नवरात्रोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना आकर्षक वेशभूषा परिधान करण्यास सांगून वर्गनिहाय दोन क्रमांक काढण्यात आले. तसेच मैदानावर इयत्ता निहाय वर्तुळाकार दांडिया नृत्य प्रकारात प्रत्येक वर्गाचे दोन क्रमांक काढण्यात आले. वेशभूषा व नृत्यप्रकार यांच्या परीक्षणाचे काम सौ. संगीताताई देवरे व सौ. रत्नप्रभा सोनार यांनी पार पाडले. दांडिया खेळताना विद्यार्थी देहभान हरपून नृत्य करत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संदीप चौधरी सर तर आभारप्रदर्शन श्री. अनिल माळी सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सी. डी. पाटील सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
"वेशभूषा व वार्षिक पारितोषिक वितरण समारोह संपन्न".
शिरपूर येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत वेशभूषा स्पर्धा व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी महिला व बालकल्याण सभापती रंजनाताई सोनवणे, नगरसेविका आशाताई बागुल, माजी नगरसेवक दिलीप बोरसे,योग विद्याधाम संचालक डॉ.श्रीकांत वाडीले,ऍंड. ललेश चौधरी, ऍड. ज्ञानेश्वर थोरात, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय वरसाळे, साधन व्यक्ती मनोहर वाघ,सचिन जडिये, नितीन पाटील,उत्तम महाराष्ट्र विद्यापीठ सिनेट सदस्य अमोल सोनवणे, मुख्याध्यापक गणेश साळुंके, महेंद्र परदेशी, मनोज पाटील, गोपाल पाटील, रवींद्र खोंडे,विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील आदी उपस्थित होते.
वेशभूषा कार्यक्रमात शाळेतील ६१ विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा सादर केल्या यात बालवाडी ते चौथी वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
प्रत्येक वर्गातून प्रथम क्रमांक काढण्यात आला. सदर प्रथम येणाऱ्या विद्यार्थास सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरणाची संधी देण्यात येणार आहे. वेशभूषा परीक्षण विवेकानंद ठाकरे व ज्वाला मोरे यांनी केले.
वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात इयत्ता बालवाडी ते चौथी वर्गातील विविध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमात चारशे ऐंशी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा घेण्यात आल्या.त्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल,उपाध्यक्ष राजगोपाल भंडा री यांनी बक्षीस योजनेसाठी भरीव आर्थिक मदत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी मिशन स्वच्छ विद्यालय अंतर्गत शिरपूर वरवाडे नगरपालिके तर्फे स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त झाल्याचे सांगितले.तसेच शिक्षकांनी स्वखर्चाने डिजीटल वर्ग केल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र माळी,गजेंद्र जाधव यांनी केले.आभार अविनाश राजपूत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश सोलंकी, जगदीश धनगर, संदीप चौधरी, गोपाल न्हावी,सुभाष भिल, प्रकाश ईशी,योगेश बागुल, मोहिनी सोनवणे, स्मिता साळुंखे, वंदना सोनवणे, बबिता काटोले, रेखा माळी,श्वेता चौधरी यांनी परिश्रम घेतले.

"वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न".
शिरपूर येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्ष जयश्रीबेन पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,विश्वस्त गोपाल भंडारी, संस्थेचे सी.ई. ओ.डॉ. उमेश शर्मा,महिला व बालकल्याण सभापती रंजनाताई सोनवणे, नगरसेविका संगीताताई देवरे,आशाताई बागुल, वित्त अधिकारी नाटूसिंग गिरासे,माजी नगरसेवक दिलीप बोरसे,ऍड. ज्ञानेश्वर थोरात, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय वरसाळे, साधन व्यक्ती मनोहर वाघ ,उत्तम महाराष्ट्र विद्यापीठ सिनेट सदस्य अमोल सोनवणे,डॉ.दीपक बागुल, मुख्याध्यापक गणेश साळुंके, महेंद्र परदेशी, मनोज पाटील, गोपाल पाटील, रवींद्र खोंडे,विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात वीस विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा सादर करून उपस्थित पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले.यात नवनवीन विषयांचे सादरीकरण तसेच उद्बोधन केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात बालवाडी ते चौथी वर्गातील एकवीस विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमात पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी प्रास्ताविकात शैक्षणिक वर्षातील यशोगाथा पी.पी.टी.च्या माध्यमातून मांडली,तसेच पुढील वाटचालीस विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सांस्कृतिक कार्यक्रमात थीम बेस कार्यक्रमाचे सादरीकरण केले.यात ओल्ड इज गोल्ड,बॉलिवूड सॉंग,महाराष्ट्रातील सण व उत्सव,महाराष्ट्राची संस्कृती आदी विषयांवर वैविध्यपूर्ण सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र माळी,गजेंद्र जाधव ,जगदीश धनगर यांनी केले.
आभार जगदीश सोलंकी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप चौधरी, अविनाश राजपूत, गोपाल न्हावी,प्रकाश ईशी,रेखा माळी,मोहिनी सोनवणे,स्मिता साळुंखे, वंदना सोनवणे,रमेश शिरसाठ, सुभाष भिल, वैशाली बारी,संगीता चव्हाण, अर्चना जोशी, शुभांगी बाविस्कर,योगेश बागुल, अनिल माळी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा