Monday 19 February 2018

"मा. मम्मीजी यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक विभागात भव्य क्रीडा मेळाव्याचे आयोजन."

"मा. मम्मीजी यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक विभागात भव्य क्रीडा मेळाव्याचे आयोजन."

शिरपूर येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलात दि.१८ डिसेंबर २०१७  सोमवार रोजी मा. हेमंतबेन आर.पटेल (मम्मीजी) यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक विभागाचा भव्य क्रीडा मेळावा संस्थेच्या मध्यवर्ती इमारतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला.क्रीडा मेळाव्याचे हे तिसरे वर्ष होते.
क्रीडा मेळावा उद्घाटन प्रसंगी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त ऍड.सी.बी.अग्रवाल,गटशिक्षणाधिकारी पी.झेड.रणदिवे,विश्वस्त फिरोज खॉं काझीबालाजी संस्थानचे उपाध्यक्ष गोपाल भंडारी, विश्वस्त बबनलाल अग्रवाल, पिपल्स बॅक चेअरमन योगेश भंडारी, मर्चंट बँक चेअरमन प्रसन्न जैन,विश्वस्त कमलकिशोर भंडारी,स्पोर्ट्स डायरेक्टर प्रितेश पटेल, जाकीर शेख ,शिक्षण विस्तार अधिकारी बी.एस.कोळी,केंद्रप्रमुख मल्हारराव सुर्यवंशी,अनिल बाविस्कर,मनोहर वाघ,लेखापरीक्षक अनुप शिंपी,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा आदी उपस्थित होते.

क्रीडा महोत्सवात मराठी,इंग्रजी, उर्दु ,आश्रम शाळांसह संस्थेच्या तेवीस शाळा सहभागी झाल्या आहेंत.

क्रीडा महोत्सवात मराठी,इंग्रजी, उर्दु ,आश्रम शाळांसह संस्थेच्या तेवीस शाळा सहभागी झाल्या आहेंत.

शालेय स्तरावर ४ डिसेंबर ते ६ डिसेंबर क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.शालेय स्तरावरील प्रत्येक खेळातील प्रथम दोन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना महोत्सवात खेळण्याची संधी देण्यात आली होती.एकूण तेरा क्रीडा प्रकारात १३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

प्राथमिक विभागासाठी अदययावत संगणक लॅब संस्थेने तयार करून दिलीे आहे. विश्वस्त बबनलाल अग्रवाल यांच्या हस्ते  संगणक लॅबचे उद्घाटन करण्यात आले. तसेच प्राथमिक विभागातील उपशिक्षक महेंद्र माळी व संजय पटेल यांच्या डिजिटल वर्गाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी शालेय शिक्षण मंत्री आ. अमरीशभाई पटेल,आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष भुपेशभाई पटेल नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल,शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक सी.डी.पाटील यांनी सादर केले.सुत्रसंचालन महेंद्र माळी व फिरोज कुरेशी यांनीं केले.आभार गणेश साळुंके यांनी मानले. संस्थेतील  मुख्याध्यापक पी.डी.कुलकर्णी,  बी.आर.महाजन,आर.टी.भोई,भटू माळी,बापू सोनवणे,रितेश कुलकर्णी, ईश्वर पाटील, मनोज पाटील,गोपाल पाटील,सय्यद इफ्तेखार,के.टी.जाधव, महेंद्र परदेशी,रवींद्र खोंडे,प्रदीप गहिवरे व संस्थेतील विविध खेळाचे प्रशिक्षक,क्रीडा शिक्षक महोत्सवाठी परिश्रम घेतले.





No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा