Friday, 8 September 2017

पायाभूत चाचणी परीक्षा

पायाभूत चाचणी परीक्षा 

इयत्ता २ री ते ७ वी पायाभूत चाचणी परीक्षे दरम्यान आज 
  मा. श्रीमती प्रतिभा भावसार , 
अधिव्याख्याता डायट धुळे 
यांनी भेट देऊन परीक्षार्थी विद्यार्थी यांच्याशी हितगूज केले 
व शाळेच्या शिक्षकांशी पायाभूत चाचणी परीक्षेसंदर्भात 
चर्चा करुन मार्गदर्शने केले. 



पुस्तक भेट

वाढदिवसाची सदिच्छा भेट 

दररोज किमान एका विदयार्थ्याचा  शाळेत वाढदिवस असतो. 
सदर विद्यार्थी शाळेत चॉकलेट वाटप करून वाढदिवस साजरा करतो.
ते न करता त्या पैशातून एक छोटे पुस्तक शाळेच्या ग्रंथालयाला भेट द्यावे अशी अभिनव कल्पना शाळेत सुरू करण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आज चि. अंगद राजपूत या बालमित्राचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्याने ₹ ३००/- किंमतीचे साने गुरुजी यांचे "भारतीय संस्कृती " पुस्तक मुख्याध्यापकांना भेट दिले आहे.

साने गुरुजी यांचे "भारतीय संस्कृती 
साने गुरुजी यांचे "शामची आई" 

Thursday, 7 September 2017

Tuesday, 5 September 2017

शिक्षक दिवस

 " शिक्षक दिनानिमित्त शाळेला मिळाली पुस्तकांची भेट ."

     " शिरपूर एज्युकेशन  सोसायटी संचलित आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर येथे 
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन 
म्हणून साजरी करीत विविध कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
      कार्यक्रम प्रसंगी कृषी विस्तार अधिकारी  योगेश पाटील, मुख्याध्यापक भटू माळी,मनोज पाटील, भीमराव महाजन,आर.व्ही.सूर्यवंशी, सिप अबॅकसचे संचालक जयेश शहा विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील,शिक्षक आदी उपस्थित होते.
इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारीत वक्तृत्व  सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.डी. पाटील यांनी केले.
शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील शिक्षकांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
पालक कृषी विस्तार अधिकारी योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे धडे मिळावेत यासाठी सुमारे सात हजार रुपये किंमतीची पुस्तके शाळेला भेट केली.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून सिप अबॅकस मार्फत घेण्यात आलेल्या ऑल इंडिया अरेथमेटिक्स जिनियस काँटेस्ट राउंड दोन मधील १५ विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन अविनाश राजपूत यांनी केले.तर आभार महेंद्र माळी यांनी मानले.
कार्यक्रम प्रसंगी पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश सोलंकी,संदीप चौधरी, गोपाल न्हावी,प्रकाश ईशी, गजेंद्र जाधव, रमेश शिरसाठ, जगदीश धनगर,योगेश बागुल, अनिल माळी,सुभाष भिल यांच्यासह संदीप पाटील, सागर पवार ,सतिष पाटील,यशोदा पाटील यांनी परिश्रम घेतले.






Thursday, 31 August 2017

English Speech Competition

दिनांक 14/9/2017 

मा. भाई साो.आ.अमरीशभाई पटेल 

यांच्या वाढदिवसानिमित्त 

'तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा'




Notebooks


पर्यारण संरक्षण

प्लॅस्टीकच्या वस्तूंचे रिसायक्लीनींग

शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी पर्यावरण जाणीव जागृती निर्माण करण्याच्या द्ष्टीने
 याच शाळेत शिक्षण घेणारे माजी विद्यार्थी आपल्या लहान बांधवांना 
प्लॅस्टीकच्या वस्तूंचे रिसायक्लीनींग 
कसे करावे 
याबाबत मार्गदर्शन करत असतांना.






School Environment


'राज्य स्तरीय खुली गीतगायन स्पर्धा'

युवकांचे लाडके नेता मा. श्री. भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित 'राज्य स्तरीय खुली गीतगायन स्पर्धा' 



गणेशोत्सव - इको फ्रेंडली गणेश

इको फ्रेंडली गणेश

गणेशोत्सवाचे औचित्य साधून 
पर्यावरण संरक्षण जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी 
शाळेतील विद्यार्थ्यांना 
शाळू माती, गव्हाची कणीक, काळ माती इत्यादी पदार्थांपासून 
श्रीगणेशाच्या मूर्त्या तयार करण्यासाठी
 विद्यार्थ्यांना प्रेरीत करण्यात आले.



पोळा

बैल पोळा - अनुभव कथन 

बैल पोळा हा सण कसा साजरा केला 
अनुभव कथन करतांना 
इयत्ता 1 ली वर्गातील 
चिमुकले विद्यार्थ्यी