रक्षाबंधनानिमित्ताने झाडांना राखी बांधून चिमुकल्यांनी दिला "झाडे वाचवा" चा संदेश.
" शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर.सी.पटेल प्राथमिक शाळा, शिरपूर
येथे रक्षाबंधन सणा निमित्ताने " राखी बनवण्याची स्पर्धा " यशस्वीपणे संपन्न झाली.
कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सी.डी. पाटील व शिक्षक उपस्थित होते.
सदर स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.
प्रथम गट :१ ली व २ री
द्वितीय गट: ३ री व ४ थी.
प्रथम गटात १३५ तर द्वितीय गटातून १४१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
इयत्तनिहाय प्रथम दोन क्रमांक काढण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी श्रीमती स्मिता साळुंखे व श्रीमती बी.बी.काटोले यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाबद्दल मार्गदर्शन केले. भारतीय संस्कृती व वैविध्यपूर्ण असणारे सण आपल्यावर संस्कार करतात.असे स्मिता साळुंखे यांनी मार्गदर्शनात सांगितले.
यावेळी इयत्ता ४थी च्या विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविला यात त्यांनी शालेय परिसरातील सर्वाधिक जुने वृक्षराजाला मोठी राखी बांधून झाडे वाचवा असा संदेश परिसरातील नागरिकांना दिला.
झाडांचे महत्त्व सर्वांनी जाणावे अस या चिमुकल्यांना वाटत हॊते.
यावर्षी देखील पावसाचे प्रमाण कमी असल्याने झाडांची होणारी कत्तल थांबावी. या उद्देशाने विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली.
गजेंद्र जाधव,गोपाळ न्हावी,सुभाष भिल,संदीप चौधरी, महेंद्र माळी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा