"भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रथम शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी दिवस."
आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरी करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक श्री. सी. डी. पाटील, सौ. आर.डी. माळी, सौ. एम.आर.सोनवणे, श्रीमती बी.बी.काटोले, श्री. रमेश शिरसाठ आदी उपस्थित होते. दि.७ नोव्हेंबर १९०० रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथील शाळेत प्रथम प्रवेश निमित्ताने विद्यार्थी दिवस साजरी करण्यात आला. प्रथम प्रवेश दिनानिमित्त विवध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय एकसंघतेसाठी केलेले कार्य भारतीय संविधान या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र माळी यांनी केले. श्री. जगदीश सोलंकी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. तर आभार श्री. प्रकाश ईशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी, श्री. अविनाश राजपूत, श्री. गजेंद्र जाधव, श्री. सुभाष भिल, श्री. संदीप चौधरी, श्री. अनिल माळी, श्री. गोपाल न्हावी, श्री. जगदीश धनगर, श्री. योगेश बागुल यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा