"स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता रॅलीचे आयोजन."
शिरपूर येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळा शिरपूर शाळेत स्वच्छता
सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. औपचारिक
कार्यक्रम प्रसंगी आरोग्य सभापती सलीम खाटीक, कोऑरडीनेटर तेजस्विनी
मानकर,महेंद्र परदेशी, गणेश साळुंखे,विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.
पाटील, जगदीश सोलंकी, रमेश शिरसाठ, सुभाष भिल आदी उपस्थित होते. मिशन स्वच्छ विद्यालय बाबत मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी मार्गदर्शन केले. समाजात स्वच्छता बाबत जनजागृती व्हावी यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला.रॅलीतून स्वच्छ शहर,सुंदर शहर अशी वाक्ये वदवून गल्लीतुन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव जागृती करिता शालेय स्तरावर दोन गटातून चित्र रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.इयत्ता १ ली व २ री ,३ री व ४ थी या गटातून अनुक्रमे प्रथम दोन क्रमांक काढण्यात आले.दोन
गटात घेतलेल्या स्पर्धेत कचरा ,कचरा पेटीत टाकणारा मुलगा,साफसफाई करणारा
मुलगा अशी चित्रे विद्यार्थ्यांना रंगविण्यासाठी देण्यात आली.सूत्रसंचालन गजेंद्र जाधव यांनी केले. आभार संदीप चौधरी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेंद्र माळी, अविनाश राजपूत,गोपाल न्हावी, जगदीश धनगर , भिल,यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा