क्षेत्रभेट - पोस्टऑफिस
आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज दिनांक 24/07/2019 वार बुधवार रोजी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. इयत्ता चौथी मधील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना शिरपूर शहरातील मार्केट यार्ड जवळील पोस्ट ऑफिस च्या मुख्य शाखेत नेण्यात आले. पोस्टाचे दैनंदिन कामकाज कशा प्रकारे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना झाला पाहिजे यासाठी या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील शिक्षकांनी पोस्टात चालणाऱ्या विविध कामांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. पोस्टात पत्रव्यवहार कसा होतो, मनीऑर्डर कशी पाठवली जाते, पत्र व पाकिटांचे वितरण कसे केले जाते, साहित्याची देवघेव करणे, आधार कार्ड काढणे, आधार कार्ड मधील माहितीत बदल करणे इत्यादी पोस्टातील विविध कामांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी
‘मी पोस्टात का आलो होतो?’
याबाबतचा आपला अनुभव कथन केला. ही क्षेत्रभेट यशस्वी होण्यासाठी पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी व अधिकारी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा