स्वच्छता सर्वेक्षण जनजागरुकता
स्वच्छता जनजागरुकता - आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत शिरपूर शहरातील नगरवासीयांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी प्रभाग क्रमांक - १ या परिसरात शाळेतील शिक्षकांनी घरोघरी भेटी दिल्या. परिसर स्वच्छ राखण्यासाठी घरातील कचरा कचरापेटीत टाकावा. घरात व परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे विलगीकरण 'ओला कचरा व सुका कचरा' असे करून नगरपालिकेने दिलेल्या डस्टबीन मध्ये ओला कचरा टाकावा व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र डस्टबीन करावी व त्यांचा वापर करावा. यामुळे नगरपालिकेत कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोयीचे होईल. आपल्या घराचा परिसर
'वापरा आणि फेका ऐवजी वापरा आणि पुन्हा वापरा'
अशी आपण सर्वांनी सवय लावून घेतली तर परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल. प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर कमी करून त्याऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करावा इत्यादीबाबत नागरिकांमध्ये स्वच्छते संदर्भात जनजागृती करण्यात आली. तसेच नागरिकांच्या अडी अडचणींची नोंद घेऊन त्या सोडविण्याबाबत नगरपालिकेशी संपर्क साधण्यात आला.
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा