Saturday 12 October 2019

शिक्षक दिन

शिक्षक दिन

शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी जीईओजीत कंपनीचे एरिया मॅनेजर माजी विद्यार्थी प्रशांत टोकशा, विद्यालयाचे  मुख्याध्यापक सी.डी. पाटील,जगदीश सोलंकी, रमेश शिरसाठ, उज्ज्वला पाटील, संदीप चौधरी, गोपाल न्हावी,अविनाश राजपूत,जगदीश धनगर,पुनम सूर्यवंशी आदी उपस्थित होते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून इयत्ता तिसरी व चौथी वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभागाची संधी निर्माण करण्यासाठी शाळा व्यवस्थापन नेहमीच आग्रहाची भूमिका घेत असते. 
मुख्याध्यापकांची भूमिका कुश अभय जाधव याने साकारली.
माजी विद्यार्थी प्रशांत टोकशा यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या आठवणी जागृत केल्या. शिक्षक दिनी माझ्या हातून माझ्या गुरुजनांचा सत्कार होत असल्याने मी भारावून गेलो आहे.इतर विद्यार्थ्यांप्रमाणे समोर बसून कार्यक्रम पाहणारा मुलगा स्टेजवर बसून माझं बालपण आठवत असल्याचे मत त्याने व्यक्त केले. मुलांनी अभ्यासाबरोबर कला, क्रीडा व खेळाकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.  मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकाची विद्यार्थ्यांप्रती भूमिका काय असते, शिक्षक विद्यार्थ्यांना कशाप्रकारे संस्काराचे धडे देतात, शिक्षकांच्या वर्गातील प्रत्येक कृती विद्यार्थी हितासाठी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र जाधव यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेंद्र माळी,योगेश बागुल, जितेंद्र करंके, तुळशीराम पावरा यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी संदीप पाटील, सागर पवार,यशोदा पाटील,सतिष पाटील यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा