शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सेंट्रल किचन आढावा बैठकीचे आयोजन.
शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर, येथे पंचायत समितीच्या माध्यमातून शहरातील सेंट्रल किचन लाभार्थी शाळांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
सभेप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी तथा अधीक्षक शालेय पोषण आहार योजना पंचायत समिती शिरपूर पी.झेड.रणदिवे, साधनव्यक्ती मनोहर वाघ,आकाश देडे,प्राचार्य पी.व्ही.पाटील, मुख्याध्यापक गणेश साळुंके,विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांच्यासह विविध शाखांचे मुख्याध्यापक,अरिहंत गृह उद्योग व नंद नमकीन, चिराई देवी बचत गटांचे संचालक आदी उपस्थित होते.
आढावा बैठकीत शहरातील सदतीस सेंट्रल किचन लाभार्थी शाळांच्या मुख्याध्यापकांना पी.झेड.रणदिवे यांनी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनात शहरातील सदतीस शाळांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून पोषण आहार पुरवठा जुलै महिन्यापासून करण्यात येत आहे.या पद्धतीने पोषण आहाराचा दर्जा उत्तम राखला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सेंट्रल किचन राबवणारी राज्यातील दुसरी नगरपालिका असल्याचे सभेप्रसंगी नमुद करण्यात आले.
शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला पोषण आहार व पूरक आहार देण्यात यावा.
असे आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले.
साधन व्यक्ती मनोहर वाघ यांनी शालेय पोषण आहार दप्तर नेहमीच अद्ययावत असावे.तांदूळ मागणी गरजेनुसार करण्यात यावी.पोषण आहार नमुना दररोज दोन स्वतंत्र डब्यात काढण्यात यावा. याबद्दल मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापकांच्या वतीने आदर्श शाळा मुख्याध्यापिका वंदना रघुवंशी,आदर्श शिक्षक हरीलाल जुलवाणी,महेंद्र भिकन माळी या शिक्षकांचा गौरव पी.झेड.रणदिवे यांच्याहस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन महेंद्र माळी यांनी केले.
आभार गजेंद्र जाधव यांनी मानले.
सभा यशस्वीतेसाठी संदीप पाटील, सागर पवार यशोदा पाटील यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा