Thursday 7 December 2017

स्वच्छता रॅली

"स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता रॅलीचे आयोजन."

         
           शिरपूर येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळा शिरपूर शाळेत स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. औपचारिक कार्यक्रम प्रसंगी आरोग्य सभापती सलीम खाटीक, कोऑरडीनेटर तेजस्विनी मानकर,महेंद्र परदेशी, गणेश साळुंखे,विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील, जगदीश सोलंकी, रमेश शिरसाठ, सुभाष भिल आदी उपस्थित होते. मिशन स्वच्छ विद्यालय बाबत मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी  मार्गदर्शन केले. समाजात स्वच्छता बाबत जनजागृती व्हावी यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला.रॅलीतून स्वच्छ शहर,सुंदर शहर अशी वाक्ये वदवून गल्लीतुन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव जागृती करिता शालेय स्तरावर दोन गटातून चित्र रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.इयत्ता १ ली व २ री ,३ री व ४ थी या  गटातून अनुक्रमे प्रथम दोन क्रमांक काढण्यात आले.दोन गटात घेतलेल्या स्पर्धेत कचरा ,कचरा पेटीत टाकणारा मुलगा,साफसफाई करणारा मुलगा अशी चित्रे विद्यार्थ्यांना रंगविण्यासाठी देण्यात आली.सूत्रसंचालन गजेंद्र जाधव यांनी केले. आभार संदीप चौधरी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेंद्र माळी, अविनाश राजपूत,गोपाल न्हावी, जगदीश धनगर , भिल,यांनी परिश्रम घेतले.


 

Monday 4 December 2017

संविधान दिवस

"संविधान दिवस"

                    शिरपूर येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळा शिरपूर शाळेत संविधान दिवस उत्साहात साजरी करण्यात आला. या औपचारिक कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील, ज्येष्ठ शिक्षिका सौ. आर. डी. माळी, श्रीमती एम. आर. सोनवणे, सौ. स्मिता साळुंखे, सौ.  वंदना सोनवणे, श्री. जगदीश सोलंकी, श्री. रमेश शिरसाठ, श्री.  प्रकाश ईशी आदी उपस्थित होते.  २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्याकडे संविधान सुपुर्द केले.  तो दिवस भारतभर सर्वत्र संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.  मुख्याध्यापक श्री. सी. डी. पाटील यांनी संविधानातील  मार्गदर्शक तत्वे समजावून सांगितले. यात न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आदी महत्वपूर्ण गोष्टीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संविधानाचे महत्त्व श्री. अविनाश राजपूत यांनी विषद केले.  स्वातंत्र्यानंतर भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र होणार,प्रजा हितासाठी संविधान ही एक उत्तम नियमावली आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांची संविधानिक जबाबदारी निश्चित करण्यात आली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संविधान दिनाचे औचित्य साधून इयत्ता दुसरीतील अनार्य भुषण बछाव या विद्यार्थ्याने गोष्टीचे पुस्तक शाळेला भेट म्हणून दिले. विद्यार्थ्यांकडून संविधानतेची शपथ देण्यात आली. सूत्रसंचालन व आभार श्री. गजेंद्र जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.  महेंद्र माळी, श्री.  गोपाल न्हावी, श्री. जगदीश धनगर , श्री. योगेश बागुल , श्री. अनिल माळी, श्री. संदीप चौधरी , श्री. सुभाष भिल यांनी परिश्रम घेतले.