Thursday 31 August 2017

English Speech Competition

दिनांक 14/9/2017 

मा. भाई साो.आ.अमरीशभाई पटेल 

यांच्या वाढदिवसानिमित्त 

'तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा'




Notebooks


पर्यारण संरक्षण

प्लॅस्टीकच्या वस्तूंचे रिसायक्लीनींग

शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी पर्यावरण जाणीव जागृती निर्माण करण्याच्या द्ष्टीने
 याच शाळेत शिक्षण घेणारे माजी विद्यार्थी आपल्या लहान बांधवांना 
प्लॅस्टीकच्या वस्तूंचे रिसायक्लीनींग 
कसे करावे 
याबाबत मार्गदर्शन करत असतांना.






School Environment


'राज्य स्तरीय खुली गीतगायन स्पर्धा'

युवकांचे लाडके नेता मा. श्री. भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित 'राज्य स्तरीय खुली गीतगायन स्पर्धा



गणेशोत्सव - इको फ्रेंडली गणेश

इको फ्रेंडली गणेश

गणेशोत्सवाचे औचित्य साधून 
पर्यावरण संरक्षण जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी 
शाळेतील विद्यार्थ्यांना 
शाळू माती, गव्हाची कणीक, काळ माती इत्यादी पदार्थांपासून 
श्रीगणेशाच्या मूर्त्या तयार करण्यासाठी
 विद्यार्थ्यांना प्रेरीत करण्यात आले.



पोळा

बैल पोळा - अनुभव कथन 

बैल पोळा हा सण कसा साजरा केला 
अनुभव कथन करतांना 
इयत्ता 1 ली वर्गातील 
चिमुकले विद्यार्थ्यी


Ideal Class


Student Activity


राज्य स्तरीय गीतगायन स्पर्धा

युवकांचे लाडके नेता मा. श्री. भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित 'राज्य स्तरीय खुली गीतगायन स्पर्धा

गट अ - 5 ते 14 वर्षा आतील [लहान गट] 

सहभागी विद्यार्थी





क्षेत्र भेट - पोष्ट ऑफिस

आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळ शिरपूर 

दिनांक 29/08/2017 वार मंगळवार रोजी इयत्ता 4 थी वर्गातील 215 विद्यार्थ्यांनी 
शिरपूर शहराच्या मुख्य पोष्ट ऑफिसला भेट दिली. 
पोष्टाचा कारभार कसा चालतो ते प्रत्यक्ष अनुभवले.  
पत्राचा प्रवास कसा होतो हे विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. 

पत्र पाठवणे, मनिऑर्डर करणे, वीज बीलाचे पैसे जमा करणे, ऑनलाईन शॉपिंगच्या वस्तू घरपोच उपलब्ध करुन देणे 

इत्यादी उपयोग सर्वसामान्य नागरीकास कशा प्रकारे होतात ते 
विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. 
यावेळी विद्यार्थ्यांनी पोष्टासंदर्भातले आपले अनुभव कथन केले.








Wednesday 16 August 2017

15 ऑगस्ट

गुण गौरव विद्यार्थ्यांचा



इयत्ता 4 थीयत्ता 5 वी पूर्व माध्यमिक परीक्षा गुणवत्ता धारक विद्यार्थी मा. भाईसो. भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते बक्षीस स्विकारतांना.


पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा
साळुंखे दुर्वेश दिपक
गुणवत्ता यादीत
इयत्ता 4 थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती पूर्वतयारी स्पर्धा परीक्षा
सनेर आर्या सुनिल - प्रथम
वाल्हे प्रणव जुगल - प्रथम
लोहार कृष्णा प्रशांत - व्दितीय
पवार विश्वजीत किशोरसिंग - व्दितीय


दहीहंडी


 "श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडीचे  यशस्वी आयोजन"


     " शिरपूर एज्युकेशन  सोसायटी संचलित आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
      कार्यक्रम प्रसंगी मा.नगरसेवक दिलीप बोरसे ,पालक प्रतिनिधी भूषण पाटील,सुनिल साळुंखे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील,शिक्षक आदी उपस्थित होते.
इयत्ता बालवाडी वर्गातील छोट्या बालमित्रांनी श्रीकृष्णाची वेशभूषा सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.डी. पाटील यांनी केले.
सूत्रसंचालन महेंद्र माळी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश सोलंकी,संदीप चौधरी, अविनाश राजपूत, गोपाल न्हावी,प्रकाश ईशी, गजेंद्र जाधव, रमेश शिरसाठ, जगदीश धनगर,योगेश बागुल, शुभांगी बाविस्कर, संगिता चव्हाण, अर्चना जोशी,व्ही.डी तांबोळी यांनी परिश्रम घेतले.







रंगभरण स्पर्धा

किमया :- कला विषयक उपक्रम
संस्थास्तरीय रंगभरण स्पर्धा

प्रथम गट - इयत्ता १ ली व  इयत्ता २ री
द्वितीय गट - इयत्ता ३ री व इयत्ता ४ थी


शालेय अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना विविध उपक्रमात सहभागी करुन त्यांच्या सुप्तकलागुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांचे रंगज्ञान, रंगयोजना, रंगछटा काटेकोरपणा व स्वच्छता इ. कौशल्य विकसीत करणेसाठी आयोजीत संस्थास्तरीय रंगभरण स्पर्धेचे दिनांक 14 ऑगस्ट वार सोवार रोजी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शाळेतील प्रथम व व्दितीय गटात 832 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. 

रंग भरण करतांना रममाण झालेले ‍विद्यार्थी 



Saturday 12 August 2017

गीतगायन स्पर्धा


गीतगायन स्पर्धा

        ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित                   देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा यशस्वीपणे संपन्न. 

    " शिरपूर एज्युकेशन  सोसायटी संचलित आर.सी.पटेल प्राथमिक शाळा, शिरपूर येथे ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित " गीतगायन स्पर्धा " यशस्वीपणे  संपन्न झाली.
  गीतगायन स्पर्धेत वैयक्तिक व सामुहीक देशभक्तीपर गीतांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
सामूहिक देशभक्तीपर गीत गायनाची  दोन गटात स्पर्धा घेण्यात आली.
प्रथम गट :१ ली व २ री 
द्वितीय गट: ३ री व ४ थी.
प्रथम गटात ७८ तर द्वितीय गटातून २८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेतील यशस्वी वर्ग पुढीलप्रमाणे;
सामुहिक गायन पहिला गट:
प्रथम इयत्ता २ री तुकडी मोगरा  
द्वितीय:इयत्ता २ री तुकडी गुलाब 
यांनी यश संपादन केले. 
सदर वर्गांना वर्गशिक्षिका स्मिता साळुंखे व वंदना सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
   द्वितीय गट: ३ री व ४ थी.
यशस्वी वर्ग खालील प्रमाणे,
प्रथम:इयत्ता ४ थी तुकडी गुलाब.
द्वितीय:इयत्ता ४ थी तुकडी जास्वंद
तृतीय:इयत्ता ४ थी तुकडी चाफा
उत्तेजनार्थ:इयत्ता ३ री मोगरा.
सदर वर्गांना वर्गशिक्षक संदीप चौधरी, सुभाष भिल,गोपाल न्हावी,जगदीश सोलंकी यांचे मार्गदर्शन लाभले.
वैयक्तिक गीत गायन प्रकारात वर्गनिहाय प्रथम दोन क्रमांक काढण्यात आले.
अशा १६ वर्गांमधून ३२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
                स्पर्धा परीक्षण मुख्याध्यापक सी.डी.पाटील, मोहिनीं सोनवणे व बबिता काटोले यांनी केले.



वैयक्तिक गायनात  प्रथम व व्दितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी








Saturday 5 August 2017

रक्षा बंधन :- राखी तयार करणे


रक्षाबंधनानिमित्ताने झाडांना राखी बांधून चिमुकल्यांनी दिला "झाडे वाचवा" चा संदेश.

     " शिरपूर एज्युकेशन  सोसायटी संचलित आर.सी.पटेल प्राथमिक शाळा, शिरपूर 
येथे रक्षाबंधन सणा निमित्ताने " राखी बनवण्याची स्पर्धा " यशस्वीपणे  संपन्न झाली.
   कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सी.डी. पाटील व शिक्षक उपस्थित होते.
  सदर स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.
प्रथम गट :१ ली व २ री 
द्वितीय गट: ३ री व ४ थी.

प्रथम गटात १३५ तर द्वितीय गटातून १४१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

  इयत्तनिहाय प्रथम दोन क्रमांक काढण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी श्रीमती स्मिता साळुंखेश्रीमती बी.बी.काटोले यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाबद्दल मार्गदर्शन केले. भारतीय संस्कृती व वैविध्यपूर्ण असणारे सण आपल्यावर संस्कार करतात.असे स्मिता साळुंखे यांनी मार्गदर्शनात सांगितले.
    यावेळी इयत्ता ४थी च्या विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविला यात त्यांनी शालेय परिसरातील सर्वाधिक जुने वृक्षराजाला मोठी राखी बांधून झाडे वाचवा असा संदेश परिसरातील नागरिकांना दिला.
झाडांचे महत्त्व सर्वांनी जाणावे अस या चिमुकल्यांना वाटत हॊते.
 यावर्षी देखील पावसाचे प्रमाण कमी असल्याने  झाडांची होणारी कत्तल थांबावी. या उद्देशाने विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली.
 गजेंद्र जाधव,गोपाळ न्हावी,सुभाष भिल,संदीप चौधरी, महेंद्र माळी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
 वर्गावर्गातून मुलींनी वर्गातील बंधूंना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली.






Tuesday 1 August 2017

लोकमान्य टिळक पुण्यतिथी :- वक्तृत्व स्पर्धा



" लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत एकपात्री अभिनयाने कुमार वेदांत राजपूत याने विद्यार्थ्यांना केले मंत्रमुग्ध"

     " शिरपूर एज्युकेशन  सोसायटी संचलित आर.सी.पटेल प्राथमिक शाळा, शिरपूर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी  व शाहीर अण्णाभाऊ जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा  यशस्वीपणे  संपन्न झाली.
   कार्यक्रम प्रसंगी विद्यमान नगरसेविका सौ.रंजनाताई सोनवणे ,श्री महेंद्र परदेशी ,श्री अमोल सोनवणे,पालक प्रतिनिधी सौ. पौर्णिमा राजपूत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सी.डी. पाटील आदी उपस्थित होते.
   इयत्ता ४ थी वर्गातील कुमार वेदांत राजपूत याने लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत 
" मी टिळक बोलतोय "
एकपात्री नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
  सदर स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.प्रथम गट :बालवाडी ते २ री द्वितीय गट: ३ री व ४ थी.
प्रथम गटात ६० तर द्वितीय गटातून ६८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
  इयत्तनिहाय प्रथम दोन क्रमांक काढण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देण्यात आली.
श्री अविनाश राजपूत व श्रीमती वंदना सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विदयलयाचे मुख्याध्यापक श्री सी.डी. पाटील यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना धाडसी होण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात श्री महेंद्र परदेशी यांनी विद्यार्थ्यांना टिळकांच्या धाडसी जीवन प्रवासा बाबत मार्गदर्शन केले.  कार्यक्रम सूत्रसंचालन श्री गजेंद्र जाधव व श्री प्रकाश ईशी यांनी केले.
आभार श्री अनिल माळी यांनी मानले.