Wednesday, 16 August 2017

दहीहंडी


 "श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडीचे  यशस्वी आयोजन"


     " शिरपूर एज्युकेशन  सोसायटी संचलित आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
      कार्यक्रम प्रसंगी मा.नगरसेवक दिलीप बोरसे ,पालक प्रतिनिधी भूषण पाटील,सुनिल साळुंखे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील,शिक्षक आदी उपस्थित होते.
इयत्ता बालवाडी वर्गातील छोट्या बालमित्रांनी श्रीकृष्णाची वेशभूषा सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.डी. पाटील यांनी केले.
सूत्रसंचालन महेंद्र माळी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश सोलंकी,संदीप चौधरी, अविनाश राजपूत, गोपाल न्हावी,प्रकाश ईशी, गजेंद्र जाधव, रमेश शिरसाठ, जगदीश धनगर,योगेश बागुल, शुभांगी बाविस्कर, संगिता चव्हाण, अर्चना जोशी,व्ही.डी तांबोळी यांनी परिश्रम घेतले.







No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा