Sunday 5 August 2018

वर्ग सजावट स्पर्धा

वर्ग सजावट स्पर्धा

. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज  दिनांक 04/08/2018 वार शनिवार  रोजी वर्ग सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी इयत्ता पहिली इयत्ता दुसरी आणि इयत्ता तिसरी इयत्ता चौथी असे दोन गट करण्यात आले. वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गामध्ये विविध प्रकारचे तक्ते, चित्रे, नकाशे, वाक्य पट्ट्या शब्द पट्ट्या, तरंग चित्र, अध्यापन करताना संगणकात वापरले जाणारे पीपीटी इत्यादी वैविध्यपूर्ण साहित्याने आपला वर्ग सजवलेला होता. वर्ग सजावट करण्यासाठी वापरले साहित्य शिक्षकांनी स्वनिर्मित केलेले होते. तयार केलेल्या साहित्यात विविधता दिसून आली. अध्यापन करताना या साहित्याची परिणामकारकता निश्चितपणे दिसून येणार आहे.

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती

लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती

. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज  दिनांक 01/08/2018 वार बुधवार  रोजी लोकमान्य टिळक अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीमधील प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. यावेळी शाळेतील शिक्षक श्री धनगर सर यांनी लोकमान्य टिळकांच्या अभ्यासाप्रती असलेल्या चिकाटी जिद्द यांचे त्यांच्या जीवनात घडलेल्या घटना गोष्टीरूपात विद्यार्थ्यांना सांगितल्या. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजातील सर्व स्तरांसाठी कसे प्रभावी परिणामकारक ठरले ते शाळेतील शिक्षिका पाटील मॅडम यांनी स्पष्ट केले. लोकमान्य टिळकांची विद्यार्थी दशेतील गुण आपणही आत्मसात करावे आपला सर्वांगीण विकास घडवावा यांचे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक श्री. सी. डी. पाटील सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोकमान्य टिळक पुण्यतिथी वकृत्व स्पर्धा

लोकमान्य टिळक पुण्यतिथी वकृत्व स्पर्धा

. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज  दिनांक 30/07/2018 वार सोमवार रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्ताने शाळेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वक्तृत्व स्पर्धेनिमित्त लोकमान्य कडक महात्मा गांधीची नेताजी सुभाष चंद्र बोस शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले महात्मा फुले यासारख्या विविध थोर व्यक्तींच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी भाषणे तयार केली होती. प्रत्येक वर्गातून साधारण दहा ते पंधरा  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी मराठीतून तसेच इंग्रजीतूनही भाषणाची तयारी उत्कृष्टपणे केली होती. प्रत्येक वर्गातून प्रथम द्वितीय क्रमांक काढण्यात आले.