Saturday Activity :- Clay Work
आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज दिनांक 28/07/2018 वार शनिवार रोजी saturday activity अंतर्गत मातीकाम ही कृती आयोजित केली होती. वर्गात पाच ते सहा विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आले व त्यांना वेगवेगळ्या रंगांची माती उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यांकडून मातीच्या विविध प्रतिकृती तयार करून घेतल्या गेल्या. विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन आपल्या कल्पकतेने मातीला आकार देऊन वेगवेगळ्या प्रतिकृती आनंदाने तयार करताना दिसत होते. विद्यार्थ्यांनी फुले मातीच्या गोळ्यापासून गणपती, बेैल, फुलपाखरू, घोडा, तिरंगा, चिमणी, फूल, मणी, भौमितिक आकार, विविध प्रकारचे कार्टून्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती सुंदर रीतीने तयार केल्या. विद्यार्थिनी तयार केलेल्या प्रतिकृतीचा आकार, सुबकता, रंगसंगती, टापटीपपणा, मांडणी व सादरीकरण या मुद्दय़ांच्या आधारे प्रथम व द्वितीय क्रमांक निवडण्यात आले.
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा