Sunday, 5 August 2018

शालेय परिवहन समितीची सहविचार सभा

शालेय परिवहन समितीची सहविचार सभा

आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज दिनांक १४/०७/२०१८ वार शनिवार रोजी शालेय परिवहन समिती सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सहविचार सभेसाठी माजी नगरसेवक श्री. दिलीप बोरसे, रिक्षा चालक मालक संघाचे तालुका अध्यक्ष श्री. दत्तु माळी,  वाहतूक संघाचे सदस्य श्री. नितीन पाटील शाळेचे मुख्याध्यापक श्री. सी. डी. पाटील आदी उपस्थित होते. या सभेमध्ये विद्यार्थी संख्या मर्यादित असणे, रिक्षेच्या उजव्या बाजूला सुरक्षा गार्ड लावणे, प्रत्येक रिक्षाच्या मागे मोठय़ा अक्षरात विद्यार्थी वाहतूक अशी सूचना लिहिणे, रिक्षेत प्रथमोपचार पेटी ठेवणे,  विद्यार्थ्यांची मोबाइल संपूर्ण पत्त्यासह अद्यावत यादी करणे या प्रकारच्या मुद्द्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी वाहन चालकांनी आपल्या समस्या मुख्याध्यापकांकडे मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेंद्र माळी यांनी केले तर आभार गजेंद्र जाधव यांनी मानले.

No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा