वाढदिवस पुस्तक भेट उपक्रम
आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शालेत शाळेचे विद्यार्थी व शिक्षक आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करतात. प्रत्येक विद्यार्थी किंवा शिक्षक आपल्या वाढदिवसाला कमीत कमी एक व जास्तीत जास्त पंधरा ते वीस पुस्तके शाळेच्या ग्रंथालयाला भेट देतात. या पुस्तक भेट योजनेचे स्वागत पालकांनी केलेले आहे. मुलाच्या वाढदिवसाला पालक स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेला पुस्तक भेट देताना दिसतात. विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच वाचन संस्कृती रुजवली जावी यादृष्टीने शाळेने सदर पुस्तक भेट योजना सुरू केली आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक सी. डी. पाटील व शिक्षकांच्या संकल्पनेतून पुस्तक भेट योजना विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी पालक शिक्षक या तीनही घटकांचा समन्वय साधला जात आहे.
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा