Sunday 22 July 2018

शाळा परिवहन समिती बैठक

शाळा परिवहन समिती 




योगासन प्रात्यक्षिक

योगासन प्रात्यक्षिकअार. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज दिनांक ०६/०७/२०१७ वार शुक्रवार रोजी शाळेच्या प्रशस्त प्रांगणामध्ये इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्याचे योगासन प्रात्यक्षिक घेण्यात आले. योगासन वर्गाची सुरुवात मंत्रपठणाने करण्यात आली. विविध प्रकारच्या योगासनांचे प्रकार विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले. ताडासन,  वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, अर्धउष्ट्रासन, उष्ट्रासन, शशांकासन, उत्तानमंडूकासन, वक्रासन, मकरासन, भुजंगासन, शलभासन, सेतूबांधासन, उत्तानपादासन, अर्धहलासन, पवनमुक्तासन, शवासन, कपालभाती, नाडीशोधन, शीतली प्राणायाम, भ्रामरी प्राणायम व ध्यान या विविध आसनांचे प्रात्यक्षिक व सराव विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले. विद्यार्थ्यांना यावेळी वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचे काम शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. जगदीश सोलंकी सर यांनी पार पाडले. योगासन वर्गामध्ये इयत्ता चौथीमधील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. योगासन वर्गाच्या यशस्वीतेसाठी वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांनी विशेष परिश्रम घेतले.

गणित संबोध कार्यशाळा

गणित संबोध कार्यशाळा

आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज दिनांक १८/०७/२०१८ वार बुधवार रोजी इयत्ता चौथी वर्गासाठी ‘गणित संबोध कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी अमळनेर येथील प्राध्यापक श्री संजय न्हायदे यांनी गणित विषयातील विविध रंजक बाबी विद्यार्थ्यांना सोप्या शब्दात समजावून सांगितल्या. गणित या विषयाला आपला मित्र बनवा, गणित या विषयातील युक्त्या वापरल्या तर हा विषय अतिशय सोपा ठरतो. गणितातील बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया जलद गतीने कशा प्रकारे करता येतात यांची उदाहरणे विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्यात आली. विद्यार्थ्यांना कॅलेंडरमधील गमती जमती रंजक पद्धतीने सांगितल्या गेल्या. भौमितिक आकृत्यांची मोजणी सहजपणे व अचूक कशी करता येते ते सांगण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.


आंतरराष्ट्रीय योग दिवस

आंतरराष्ट्रीय योग दिवस
आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज दिनांक २१/०६/२०१८ वार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले.
आर. सी. पटेल फार्मसी कॉलेज करवंद नाका शिरपूर येथील मैदानावर इयत्ता तिसरी व इयत्ता  चौथी या वर्गातील विद्यार्थ्यांना सकाळी सहा वाजता नेण्यात आले. येथील प्रशस्त मैदानावर शिरपूर शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी योगासन वर्गासाठी हजर होते. शिरपूर शहरातील योग विद्या धामचे योग गुरू तसेच विविध शाखांमधील योग शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारच्या योगासनांचे प्रात्यक्षिक व सराव करून घेण्यात आला. अतिशय शिस्तबद्ध रीतीने हा योगासन वर्ग आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी योगासन करताना मंत्रमुग्ध होऊन गेले होते. योगासन वर्गाच्या शेवटी विद्यार्थ्यांकडून नियमितपणे योगा करण्याची शपथ वदवून घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आर. सी. पटेल संकुलातील सर्व शाळांना एकत्रितपणे योगासन साजरे करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Wednesday 11 July 2018

पालक शिक्षक सहविचारसभा

पालक शिक्षक सहविचारसभा 

आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत दिनांक १०/०७/२०१८ वार मंगळवार व दिनांक ११/०७/२०१८ वार बुधवार रोजी अनुक्रमे इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी वर्गांच्या पालक सहविचार सभा घेण्यात आल्या. या सहविचार सभेत खालील बाबींचा समावेश होता.


१. शालेय शिस्त. 

२. गणवेश बाबत सजक असणे.

३. विद्यार्थ्याच्या अभ्यासाबाबत जागरूक असणे. 

४. विद्यार्थ्याची डायरी नियमितपणे पाहणे. 

५. विद्यार्थ्याच्या डायरीत अभ्यास केल्यावरच सही करणे. 

६. विद्यार्थ्यास शाळेत नियमित पाठवणे. 

७. दर रविवारी online Test विद्यार्थ्याकडून सोडवून घेणे. 

८. वर्गशिक्षकाशी शाळेत भेटण्याची वेळ शनिवारी सकाळी ९:३० ते १०:३०

९. Whats app ग्रुपच्या माध्यमातून सतत संपर्कात राहणे. 

Monday 9 July 2018

कार्यानुभव

कार्यानुभव प्रात्यक्षिक 

आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत दिनांक ०९/०७/२०१८ वार सोमवार रोजी कार्यानुभव या विषयाअंतर्गत कागदाकाम प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. घोटीव कागदापासून तसेच क्राफ्ट पेपर पासून कागदाच्या विविध वस्तू कशा तयार कराव्यात या बाबत शाळेतील विद्यार्थ्यांना जोधपूर राजस्थान येथून आलेले श्री. दयालचंद्र राव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांकडून कागदापासून विविध वस्तू तयार करून घेतल्या. श्री. दयालचंद्र राव यांनी कागदापासून गुलाबपुष्प तयार करून शाळेचे मुख्याध्यापक श्री. सी. डी. पाटील सर यांचे स्वागत केले. व शाळेस कार्यानुभव विषयाचे पुस्तक सदिच्छा भेट म्हणून दिले.