Sunday, 22 July 2018

आंतरराष्ट्रीय योग दिवस

आंतरराष्ट्रीय योग दिवस
आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज दिनांक २१/०६/२०१८ वार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले.
आर. सी. पटेल फार्मसी कॉलेज करवंद नाका शिरपूर येथील मैदानावर इयत्ता तिसरी व इयत्ता  चौथी या वर्गातील विद्यार्थ्यांना सकाळी सहा वाजता नेण्यात आले. येथील प्रशस्त मैदानावर शिरपूर शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी योगासन वर्गासाठी हजर होते. शिरपूर शहरातील योग विद्या धामचे योग गुरू तसेच विविध शाखांमधील योग शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारच्या योगासनांचे प्रात्यक्षिक व सराव करून घेण्यात आला. अतिशय शिस्तबद्ध रीतीने हा योगासन वर्ग आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी योगासन करताना मंत्रमुग्ध होऊन गेले होते. योगासन वर्गाच्या शेवटी विद्यार्थ्यांकडून नियमितपणे योगा करण्याची शपथ वदवून घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आर. सी. पटेल संकुलातील सर्व शाळांना एकत्रितपणे योगासन साजरे करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा