Sunday, 22 July 2018

गणित संबोध कार्यशाळा

गणित संबोध कार्यशाळा

आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज दिनांक १८/०७/२०१८ वार बुधवार रोजी इयत्ता चौथी वर्गासाठी ‘गणित संबोध कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी अमळनेर येथील प्राध्यापक श्री संजय न्हायदे यांनी गणित विषयातील विविध रंजक बाबी विद्यार्थ्यांना सोप्या शब्दात समजावून सांगितल्या. गणित या विषयाला आपला मित्र बनवा, गणित या विषयातील युक्त्या वापरल्या तर हा विषय अतिशय सोपा ठरतो. गणितातील बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया जलद गतीने कशा प्रकारे करता येतात यांची उदाहरणे विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्यात आली. विद्यार्थ्यांना कॅलेंडरमधील गमती जमती रंजक पद्धतीने सांगितल्या गेल्या. भौमितिक आकृत्यांची मोजणी सहजपणे व अचूक कशी करता येते ते सांगण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा