योगासन प्रात्यक्षिकअार. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज दिनांक ०६/०७/२०१७ वार शुक्रवार रोजी शाळेच्या प्रशस्त प्रांगणामध्ये इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्याचे योगासन प्रात्यक्षिक घेण्यात आले. योगासन वर्गाची सुरुवात मंत्रपठणाने करण्यात आली. विविध प्रकारच्या योगासनांचे प्रकार विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले. ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, अर्धउष्ट्रासन, उष्ट्रासन, शशांकासन, उत्तानमंडूकासन, वक्रासन, मकरासन, भुजंगासन, शलभासन, सेतूबांधासन, उत्तानपादासन, अर्धहलासन, पवनमुक्तासन, शवासन, कपालभाती, नाडीशोधन, शीतली प्राणायाम, भ्रामरी प्राणायम व ध्यान या विविध आसनांचे प्रात्यक्षिक व सराव विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले. विद्यार्थ्यांना यावेळी वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचे काम शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. जगदीश सोलंकी सर यांनी पार पाडले. योगासन वर्गामध्ये इयत्ता चौथीमधील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. योगासन वर्गाच्या यशस्वीतेसाठी वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा