Friday 29 September 2017

नवरात्र उत्सव - दांडिया रास

नवरात्र उत्सव - वेशभूषा व दांडिया रास नृत्य

आज दिनांक २९/०९/२०१७ रोजी आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत नवरात्र उत्सवानिमित्ताने 'वेशभूषा व दांडिया नृत्य स्पर्धा' आयोजित करण्यात आली. शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. संगीताताई देवरे बांधकाम सभापती शिरपूर नगरपरिषद व लाइन्स क्लबच्या सदस्या सौ. रत्नप्रभा सोनार यांच्या हस्ते झाला. यावेळी आर. सी. पटेल कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गणेश साळुंके सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री. सी. डी. पाटील सर उपस्थित होते. शाळेच्या वतीने छात्र शिक्षिकांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. सौ. भारतीय गिरासे, श्रद्धा पाटील, दीपिका पाटील व अश्विनी पाटील यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. महेंद्र माळी सर यांनी सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची प्रतिमा शाळेस भेट दिली तिचाही अध्यक्षांच्या हस्ते स्वीकार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. संगीताताई देवरे यांनी उपस्थित सर्व बाल चिमुकल्यांचे खूप खूप कौतुक केले. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळा विविध उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देते याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे आभार मानले. नवरात्रोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना आकर्षक वेशभूषा परिधान करण्यास सांगून वर्गनिहाय दोन क्रमांक काढण्यात आले. तसेच मैदानावर इयत्ता निहाय वर्तुळाकार दांडिया नृत्य प्रकारात प्रत्येक वर्गाचे दोन क्रमांक काढण्यात आले. वेशभूषा व नृत्यप्रकार यांच्या परीक्षणाचे काम सौ. संगीताताई देवरे व सौ. रत्नप्रभा सोनार यांनी पार पाडले. दांडिया खेळताना विद्यार्थी देहभान हरपून नृत्य करत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संदीप चौधरी सर तर आभारप्रदर्शन श्री. अनिल माळी सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सी. डी. पाटील सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





Tuesday 26 September 2017

जंत नाशक गोळ्यांचे वाटप 

जंतापासून मुक्त होतील मुले सशक्त 

Saturday 23 September 2017

तंत्रस्नेही प्रशिक्षण

आर सी पटेल शैक्षणिक संकुलात तंत्रस्नेही प्रशिक्षण

दिनांक १७/०९/२०१७ वार रविवार रोजी आर सी पटेल मुख्य इमारत शिरपूर या ठिकाणी संकुलातील 
सर्व शाळांच्या तंत्रस्नेही शिक्षकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
 कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून
  शालेय पोषण आहार अधीक्षक श्री मनोहर वाघ, तंत्रस्नेही अशोक ढिवरे, गणेश सोनवणे 
यांचे मार्गदर्शन लाभले. 
ब्लॉग कसा तयार करावा, 
ब्लॉगमध्ये विविध प्रकारचे पेजेस पोस्ट कशाप्रकारे इन्सर्ट करावेत,
 शाळेतील विविध कार्यक्रमांचे फोटो
 शैक्षणिक व्हिडिओ ब्लॉगवर कसे अपलोड करावेत
या संदर्भात प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सी डी पाटील यांनी केले, 
तर आधार मुख्याध्यापक गणेश साळुंके यांनी मानले. 
या कार्यशाळेस सर्व सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

Saturday 16 September 2017

इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा - आयोजन व बक्षिस वितरण सोहळा

मा. मा. भाईसाो. अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 

तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा 

क्षणचित्रे

शिरपूर तालुक्यातील 297 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या अंगी असलेल्या वक्तृत्व कलेचे प्रभावी पणे सादरीकरण केले.






Thursday 14 September 2017

English Speaking Competition - Result

English Speaking Competition 2017-2018 
 Winner Students list  
    
No.Rural Group I ( Std1st & 2nd )School NameRank
1Baviskar Tanmay sarojRCP Primary School Bhorkheda1st
2Rajput Harshada MahendrasingRCP Primary School Kharde2nd
3Rajput Pratiksha DipakRCP Primary School Tekwade3rd
4Dhangar Harish DhanrajRCP Primary School Tekwadeconsolation
    
    
No.Rural Group II ( Std 3rd & 4th )School NameRank
1Rajput Bhavika HitendrasingRCP Primary Bhorkheda1st
2Pawara Mukesh TersingRCP Ashram Primary School Waghadi1st
3Sutar Mansi RajendraZ.P. Marathi Pri. School Manjarod2nd
4Patil Himanshu SunilRCP Primary School Kharde3rd
5Patel Hemant PrakashRCP Primary School Tekwadeconsolation
6Patil Ashvini SandipZ.P.Primary School Arthe Bu.consolation
    
    
No.Urban Group I ( Std1st & 2nd )School NameRank
1Borse Krutika RavindraH.R.Patel Girls School shirpur1st
2Paturkar Aayushi KetanRCP Primary School Subhash Colony2nd
3Thakre Anjali SachinH.R.Patel Girls School shirpur3rd
4Shukla Herambh AjayRCP Primary School, Shirpurconsolation
    
    
No.Urban Group II ( Std 3rd & 4th )School NameRank
1Patel Sapura HarunRCP Urdu Med. Shubhash Colony1st
2Sonawane Aakansha VijayH.R.Patel Girls School shirpur2nd
3Rajput Neha ChandrakantH.R.Patel Girls School shirpur3rd
4Patil Divya PankajRCP Primary School Kranti Nagarconsolation
    
    
No.English Med. Group I ( Std1st & 2nd )School NameRank
1Dembarani HunarARP CBSE School Shirpur1st
2Gagrani Arohi M.ARP CBSE School Shirpur2nd
 Badgujar Snehanshu SandipDr.VV Randhe English Med. School 2nd
3Patil Arnav NitinRCP English Med. School Schirpur3rd
4Patil Kartik SanjayMRP English Med. School Shirpurconsolation
    
    
No.English Med. Group II ( Std 3rd & 4th )School NameRank
1Girase Pragati YogeshARP CBSE School Shirpur1st
2Kulkarni Gauri NitinARP CBSE School Shirpur2nd
3Patil Chinmay ChandragaudaRCP English Med. School Schirpur3rd
4Patil Arnav GopalRCP English Med. School Schirpurconsolation
    
    
No.Open GroupSchool NameRank
1Rajput Vedant RameshRCP Primary School Shirpur1st
2Magar Maurya surajARP CBSE School Shirpur2nd
3Patil Mayuri SunilRCP Primary School Shirpur3rd
4Patil Sara SachinARP CBSE School Shirpurconsolation
    
   

Tuesday 12 September 2017

वह्यांची तपासणी

आर. सी. पटेल शैक्षणिक संकुल वहया तपासणी समितीमधील विविध शाखांचे मुख्याध्यापक इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वहया तपासत 
असतांनाचे क्षण. 



Sunday 10 September 2017

Spoken English

अ.न.सहभागी शाळेचे नावविद्याथी संख्या
1आर. सी. पटेल मराठी प्राथ. शाळा शिरपूर15
2आर. सी. पटेल उर्दू प्राथ. शाळा सुभाष कॉलनी शिरपूर11
3आर. सी. पटेल मराठी प्राथ. शाळा सुभाष कॉलनी शिरपूर12
4आर. सी. पटेल मराठी प्राथ. शाळा वाल्मीक नगर, शिरपूर11
5आर. सी. पटेल मराठी प्राथ. शाळा वरवाडे, शिरपूर10
6आर. सी. पटेल मराठी प्राथ. शाळा क्रांतीनगर, शिरपूर5
7आर. सी. पटेल मराठी प्राथ. शाळा टेकवाडे10
8आर. सी. पटेल मराठी प्राथ. वाघाडी आश्रमशाळा3
9जिल्हा परिषद मराठी प्राथ. शाळा बभळाज2
10जिल्हा परिषद मराठी प्राथ. शाळा अर्थे बु.4
11जिल्हा परिषद मराठी प्राथ. शाळा मांजरोद5
12जिल्हा परिषद मराठी प्राथ. शाळा वाडी बु.4
13आर. सी. पटेल मराठी प्राथ. शाळा खर्दे10
14R.C.Patel English Med. School, Varul8
15M.R.Patel English Med. School, Shirpur10
16R.C.Patel English Med. School, Babhalaj10
17R.C.Patel English Med. School, Shirpur15
18Tele International English Med. School Shirpur10

Friday 8 September 2017

पायाभूत चाचणी परीक्षा

पायाभूत चाचणी परीक्षा 

इयत्ता २ री ते ७ वी पायाभूत चाचणी परीक्षे दरम्यान आज 
  मा. श्रीमती प्रतिभा भावसार , 
अधिव्याख्याता डायट धुळे 
यांनी भेट देऊन परीक्षार्थी विद्यार्थी यांच्याशी हितगूज केले 
व शाळेच्या शिक्षकांशी पायाभूत चाचणी परीक्षेसंदर्भात 
चर्चा करुन मार्गदर्शने केले. 



पुस्तक भेट

वाढदिवसाची सदिच्छा भेट 

दररोज किमान एका विदयार्थ्याचा  शाळेत वाढदिवस असतो. 
सदर विद्यार्थी शाळेत चॉकलेट वाटप करून वाढदिवस साजरा करतो.
ते न करता त्या पैशातून एक छोटे पुस्तक शाळेच्या ग्रंथालयाला भेट द्यावे अशी अभिनव कल्पना शाळेत सुरू करण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आज चि. अंगद राजपूत या बालमित्राचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्याने ₹ ३००/- किंमतीचे साने गुरुजी यांचे "भारतीय संस्कृती " पुस्तक मुख्याध्यापकांना भेट दिले आहे.

साने गुरुजी यांचे "भारतीय संस्कृती 
साने गुरुजी यांचे "शामची आई" 

Thursday 7 September 2017

Tuesday 5 September 2017

शिक्षक दिवस

 " शिक्षक दिनानिमित्त शाळेला मिळाली पुस्तकांची भेट ."

     " शिरपूर एज्युकेशन  सोसायटी संचलित आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर येथे 
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन 
म्हणून साजरी करीत विविध कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
      कार्यक्रम प्रसंगी कृषी विस्तार अधिकारी  योगेश पाटील, मुख्याध्यापक भटू माळी,मनोज पाटील, भीमराव महाजन,आर.व्ही.सूर्यवंशी, सिप अबॅकसचे संचालक जयेश शहा विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील,शिक्षक आदी उपस्थित होते.
इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारीत वक्तृत्व  सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.डी. पाटील यांनी केले.
शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील शिक्षकांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
पालक कृषी विस्तार अधिकारी योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे धडे मिळावेत यासाठी सुमारे सात हजार रुपये किंमतीची पुस्तके शाळेला भेट केली.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून सिप अबॅकस मार्फत घेण्यात आलेल्या ऑल इंडिया अरेथमेटिक्स जिनियस काँटेस्ट राउंड दोन मधील १५ विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन अविनाश राजपूत यांनी केले.तर आभार महेंद्र माळी यांनी मानले.
कार्यक्रम प्रसंगी पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश सोलंकी,संदीप चौधरी, गोपाल न्हावी,प्रकाश ईशी, गजेंद्र जाधव, रमेश शिरसाठ, जगदीश धनगर,योगेश बागुल, अनिल माळी,सुभाष भिल यांच्यासह संदीप पाटील, सागर पवार ,सतिष पाटील,यशोदा पाटील यांनी परिश्रम घेतले.