Friday, 29 September 2017

नवरात्र उत्सव - दांडिया रास

नवरात्र उत्सव - वेशभूषा व दांडिया रास नृत्य

आज दिनांक २९/०९/२०१७ रोजी आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत नवरात्र उत्सवानिमित्ताने 'वेशभूषा व दांडिया नृत्य स्पर्धा' आयोजित करण्यात आली. शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. संगीताताई देवरे बांधकाम सभापती शिरपूर नगरपरिषद व लाइन्स क्लबच्या सदस्या सौ. रत्नप्रभा सोनार यांच्या हस्ते झाला. यावेळी आर. सी. पटेल कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गणेश साळुंके सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री. सी. डी. पाटील सर उपस्थित होते. शाळेच्या वतीने छात्र शिक्षिकांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. सौ. भारतीय गिरासे, श्रद्धा पाटील, दीपिका पाटील व अश्विनी पाटील यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. महेंद्र माळी सर यांनी सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची प्रतिमा शाळेस भेट दिली तिचाही अध्यक्षांच्या हस्ते स्वीकार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. संगीताताई देवरे यांनी उपस्थित सर्व बाल चिमुकल्यांचे खूप खूप कौतुक केले. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळा विविध उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देते याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे आभार मानले. नवरात्रोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना आकर्षक वेशभूषा परिधान करण्यास सांगून वर्गनिहाय दोन क्रमांक काढण्यात आले. तसेच मैदानावर इयत्ता निहाय वर्तुळाकार दांडिया नृत्य प्रकारात प्रत्येक वर्गाचे दोन क्रमांक काढण्यात आले. वेशभूषा व नृत्यप्रकार यांच्या परीक्षणाचे काम सौ. संगीताताई देवरे व सौ. रत्नप्रभा सोनार यांनी पार पाडले. दांडिया खेळताना विद्यार्थी देहभान हरपून नृत्य करत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संदीप चौधरी सर तर आभारप्रदर्शन श्री. अनिल माळी सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सी. डी. पाटील सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा