" शिक्षक दिनानिमित्त शाळेला मिळाली पुस्तकांची भेट ."
" शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर येथे
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन
म्हणून साजरी करीत विविध कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी कृषी विस्तार अधिकारी योगेश पाटील, मुख्याध्यापक भटू माळी,मनोज पाटील, भीमराव महाजन,आर.व्ही.सूर्यवंशी, सिप अबॅकसचे संचालक जयेश शहा विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील,शिक्षक आदी उपस्थित होते.
इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारीत वक्तृत्व सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.डी. पाटील यांनी केले.
शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील शिक्षकांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
पालक कृषी विस्तार अधिकारी योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे धडे मिळावेत यासाठी सुमारे सात हजार रुपये किंमतीची पुस्तके शाळेला भेट केली.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून सिप अबॅकस मार्फत घेण्यात आलेल्या ऑल इंडिया अरेथमेटिक्स जिनियस काँटेस्ट राउंड दोन मधील १५ विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन अविनाश राजपूत यांनी केले.तर आभार महेंद्र माळी यांनी मानले.
कार्यक्रम प्रसंगी पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश सोलंकी,संदीप चौधरी, गोपाल न्हावी,प्रकाश ईशी, गजेंद्र जाधव, रमेश शिरसाठ, जगदीश धनगर,योगेश बागुल, अनिल माळी,सुभाष भिल यांच्यासह संदीप पाटील, सागर पवार ,सतिष पाटील,यशोदा पाटील यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा