Monday 2 October 2017

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती


२ ऑक्टोंबर भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती

आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत  स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. सौ. नीता सोनवणे यांनी भुषविले, शिरपूर नगरपरिषदेचे आरोग्य सभापती श्री. सलीम भाई व नगरसेवक श्री. चंद्रकांत सोनवणे, एच. आर. पटेल मराठी कन्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. गणेश साळुंखे व सी. डी. पाटील सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी इयत्ता ३ री व ४ थी मधील राजपूत वेदांत रमेश, सोनजे क्रिश, चेतश्री राजेश कुलकर्णी, बोरसे कृतिका रवींद्र या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल भाषणे दिली. विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्स्फूर्त भाषणांचा प्रभाव मान्यवरांवर झाला व श्री चंद्रकांत सोनवणे आणि सलीमभाई यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येकी शंभर रुपयांचे रोख पारितोषिक दिले. शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका खैरणार मॅडम यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील विविध रोचक प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सौ. नीता सोनवणे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या मौलिक विचारांचे आचरण विद्यार्थ्यांनी करावे, थोर व्यक्तींचा बाणा, तत्त्व अंगीकारून तो चिरकाल टिकवावा असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी विविध घोषणांमधून स्वच्छतेचा संदेश शिरपूर शहरातील नागरिकांना दिला. शाळेच्या मुख्य इमारतीपासून आदर्शनगर या परिसरामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम एच. आर. पटेल मराठी कन्या प्राथमिक शाळा व आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या दोन्ही शाळांनी सयुक्त आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोपाल न्हावी सर तर आभार प्रदर्शन श्री प्रकाश ईशी सर यांनी केले.या कार्यक्रमाचे व रॅलीचे यशस्वीपणे आयोजन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सी.डी. पाटील सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.




No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा