गुरुपौर्णिमा
आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज दिनांक 28/07/2018 वार शनिवार रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेतील इयत्ता चौथीमधील विद्यार्थी यज्ञेश ठाकरे, दुर्गेश महाजन व गौरव पाटील यांनी आपल्या मनोगतामधून गुरूप्रती ऋण करून व्यक्त केले. लहानपणापासून आपल्याला घडवणाऱ्या, आपल्यावर योग्य संस्कारांचे शिंपण करणाऱ्या, व आपले जीवन घडवणाऱ्या शिक्षकांन प्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस. या कार्यक्रमात श्री धनगर सर म्हणाले की, आषाढ पौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरू या शब्दाचा अर्थच महान, मोठा असा आहे. शिष्याने ते मान्य केल्यावरच तो कांही तरी शिकू शकतो. एका संस्कृत श्लोकात त्याचे "गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।" असे वर्णन करून त्याला नमन केले व विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टी आत्मसात करून गुरूंचे नाव लौकिक करावे असे आवाहन त्यांनी केले.
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा