Saturday, 1 September 2018

दहीहंडी सोहळा

दहीहंडी सोहळा
अार. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज दिनांक 01/09/2018 वार शनिवार रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने saturday activity अंतर्गत दहीहंडी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी  विद्यार्थ्यांनी लाल रंगाचे आकर्षक कपडे परिधान केले होते. बालवाडी वर्गातील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाचे व विद्यार्थिनीन राधेचा वेश परिधान केला होता. उंचावरील दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांनी मनोरे तयार केले होते. विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा आनंद मनमुराद घेतला.

केरळ पूरग्रस्त मदत रली


केरळ पूरग्रस्त मदत रली  
अार. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत
आज दिनांक 27/08/2018 वार सोमवार रोजी केरळ राज्यात
आलेल्या नैसर्गिक आपत्तीसाठी मदत निधी गोळा करण्यासाठी
रालीचे आयोजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी
शिरपूर परिसरात मदत करण्याचे आवाहन करून विविध
घोषणा दिल्या. प्रत्येक दुकानात, घरात जाऊन मदत करण्याची
विनंती केली. यावेळी सुमारे ४५०० रुपये विद्यार्थ्यांनी जमा
करून आपला खारीचा वाट उचलला व केरळ राज्यात
आलेल्या पुराच्या नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या नागरिकांना
मदत केली. विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या साठवलेल्या व
रक्षाबंधना मिळालेल्या पैशांची मदत मदत पेटीमध्ये टाकली.

राखी तयार करणे

राखी तयार करणे  
अार. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज दिनांक 25/08/2018 वार शनिवार रोजी. saturday avtivity अंतर्गत राखी तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना राखी कशी तयार करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे गट तयार करून यांच्याकडून राखी तयार करून घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यामधून प्रत्येक वर्गातून प्रथम व द्वितीय क्रमांक निवडण्यात आले. विद्यार्थ्यांनी राखी कशी बनवली त्याचा अनुभव कथन करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. तसेच शालेय परिसरातील झाडांना राखी बांधून झाडे वाचवा हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. वर्गा वर्गातून मुलींनी वर्गातील बंधूंना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.

वह्या तपासणी कमिटी

वह्या तपासणी कमिटी
अार. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज दिनांक 23/08/2018 वार गुरुवार रोजी वह्या तपासणी कमिटी आली होती. आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाने नेमून दिलेल्या विविध शाखांतील मुख्याध्यापक वह्या तपासणी करिता आले. इयत्ता पहिली ते इयत्ता  चौथी या वर्गांच्या वह्यांची पाहणी या कमिटीतील सदस्यांनी केली. यावेळी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या मराठी, गणित, इंग्लिश, परिसर अभ्यास, प्रयोग वह्या व निबंध वह्या या विषयांच्या वह्या तपासल्या गेल्या. कमिटीतील सदस्यांनी चांगल्या कामाचे कौतुक केले व त्रुटी दूर करण्यासाठी सांगितले.

रंगभरण स्पर्धा

रंगभरण स्पर्धा
अार. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज  दिनांक 14/08/2018 वार मंगळवार रोजी किमया अंतर्गत रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या रंगभरण स्पर्धेसाठी इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी ‘अ’ गट आणि इयत्ता तिसरी व इयत्ता चौथी ‘ब’ गट असे वर्ग निहाय स्वतंत्र गट करण्यात आले होते. प्रत्येक गटाला स्वतंत्र वेगवेगळे चित्र देण्यात अाली व विद्यार्थ्यांकडून रेखाटलेल्या चित्रात आकर्षक रंग भरून घेण्यात आले. विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात मंत्रमुग्ध होहून रंग भरताना दिसून आले. प्रत्येक गटातून अचूक व टापटिपीने रंग भरणाऱया उत्कृष्ट विद्यार्थ्यांचे प्रथम व द्वितीय क्रमांक निवडण्यात आले. प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे संस्था स्तरीय रंगभरण स्पर्धेसाठी पात्र ठरली.

गीत गायन स्पर्धा

गीत गायन स्पर्धा
अार. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज  दिनांक 13/08/2018 वार सोमवार रोजी गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पंधरा ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य दिना निमित्ताचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना विविध देशभक्तीपर गीतांचे  तालबद्ध सादरीकरण करून घेण्यात आले. या गीत गायन स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्गात साधारणपणे पंधरा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलेला होता. वर्ग स्तरावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक वर्गातून उत्कृष्टपणे देशभक्तीपर गीत सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून प्रथम व द्वितीय क्रमांक निवडण्यात आले. बक्षीसपात्र म्हणून निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमधून पाच विद्यार्थ्यांना संस्था स्तरीय ध्वजारोहन समारंभाच्या वेळेस आपले गीत सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

जंतनाशक गोळ्यांचे वाटप

जंतनाशक गोळ्यांचे वाटप
अार. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज  दिनांक 10/08/2018 वार शुक्रवार रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करुन साजरा करण्यात आला. शालेय परिपाठाच्या वळेस शाळेतील शिक्षक श्री. जगदीश सोलंकी यांनी जंतांचा प्रादुर्भाव आपल्या शरिरात कशा प्रकारे होतो याबद्दल माहिती सांगितली. जंतांचा प्रसार कसा होतो, जंतसंसर्गाची लक्षणे कोणती, आपले आरोग्य व पोषण स्थिती यावर जतांचा होणारा परिणाम कसा होतो हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. आपणास होणारा जंतसंसर्ग कसा थांबवू शकतो याची वेगवेगळी कारणे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना सांगितली. विद्यार्थ्यांना गोळ्यांचे वाटप करून देण्यात आले. जंतनाशक गोळ्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजल्याने विद्यार्थी स्वतःहून गोळ्या घेताना दिसून आले. जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यासाठी शिरपूर शहरातील कुटीर रुग्णालय येथील अधिकाऱयांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Sunday, 5 August 2018

वर्ग सजावट स्पर्धा

वर्ग सजावट स्पर्धा

. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज  दिनांक 04/08/2018 वार शनिवार  रोजी वर्ग सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी इयत्ता पहिली इयत्ता दुसरी आणि इयत्ता तिसरी इयत्ता चौथी असे दोन गट करण्यात आले. वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गामध्ये विविध प्रकारचे तक्ते, चित्रे, नकाशे, वाक्य पट्ट्या शब्द पट्ट्या, तरंग चित्र, अध्यापन करताना संगणकात वापरले जाणारे पीपीटी इत्यादी वैविध्यपूर्ण साहित्याने आपला वर्ग सजवलेला होता. वर्ग सजावट करण्यासाठी वापरले साहित्य शिक्षकांनी स्वनिर्मित केलेले होते. तयार केलेल्या साहित्यात विविधता दिसून आली. अध्यापन करताना या साहित्याची परिणामकारकता निश्चितपणे दिसून येणार आहे.

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती

लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती

. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज  दिनांक 01/08/2018 वार बुधवार  रोजी लोकमान्य टिळक अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीमधील प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. यावेळी शाळेतील शिक्षक श्री धनगर सर यांनी लोकमान्य टिळकांच्या अभ्यासाप्रती असलेल्या चिकाटी जिद्द यांचे त्यांच्या जीवनात घडलेल्या घटना गोष्टीरूपात विद्यार्थ्यांना सांगितल्या. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजातील सर्व स्तरांसाठी कसे प्रभावी परिणामकारक ठरले ते शाळेतील शिक्षिका पाटील मॅडम यांनी स्पष्ट केले. लोकमान्य टिळकांची विद्यार्थी दशेतील गुण आपणही आत्मसात करावे आपला सर्वांगीण विकास घडवावा यांचे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक श्री. सी. डी. पाटील सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.