Saturday, 10 March 2018

वर्कशीट कार्यशाळा

 शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक व पूर्व प्राथमिक शिक्षकांसाठी संस्थेने वर्कशीट कार्यशाळेचे दिनांक २४/०२/२०१८ वार शनिवार रोजी आयोजन केला गेला. कार्यशाळेप्रसंगी  प्राचार्य ज्युलि थॉमस,मुख्याध्यापक गणेश साळुंके, महेंद्र परदेशी, रवींद्र खोंडे,आर.टी. भोई, बी.आर.महाजन,के.टी.जाधव, बी.बी.सोनवणे, पी.डी.कुलकर्णी, बी.एम.माळी,मनोज पाटील, गोपाल पाटील, सी.डी.पाटील, स्मिता पंचभाई, एलिजाबेथ जानवे आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक सी.डी.पाटील यांनी केले. गणेश साळुंके, महेंद्र परदेशी, बी.एम.माळी यांनी विविध विषयांवर शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्राचार्य ज्युलि थॉमस यांनी वर्कशीट बाबत विशेष मार्गदर्शन केले.यात वर्कशीट म्हणजे काय? प्राथमिक स्तरावर त्याची गरज काय याबाबत सविस्तर माहिती शिक्षकांना दिली. विविध विषयांचे वर्कशीट कसे तयार करावेत याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल,नगराध्यक्ष जयश्रीबेन पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक विभागासाठी नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यातील वर्कशीट अर्थातच स्वतंत्र विषयवार स्वाध्याय पुस्तक असण्याबद्दल मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा यांनी शिक्षकांना महत्त्व समजावून सांगितले. शिक्षकांनी स्व निर्मितीवर भर द्यावा असही डॉ.शर्मा यांनी मनोगतात व्यक्त केले. कार्यशाळेत प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाचे ऐंशी शिक्षकांचा सहभाग होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश राजपूत यांनी केले. आभार जगदीश धनगर यांनी मानले.