दहीहंडी सोहळा
अार. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज दिनांक 01/09/2018 वार शनिवार रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने saturday activity अंतर्गत दहीहंडी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी लाल रंगाचे आकर्षक कपडे परिधान केले होते. बालवाडी वर्गातील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाचे व विद्यार्थिनीन राधेचा वेश परिधान केला होता. उंचावरील दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांनी मनोरे तयार केले होते. विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा आनंद मनमुराद घेतला.