" शालेय परिवहन समिती मासिक सहविचार सभा"
शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर शाळेत शालेय परिवहन मासिक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. औपचारिक कार्यक्रम प्रसंगी रिक्षा वाहतूक संघाचे तालुका अध्यक्ष श्री. दत्तू माळी , शहराध्यक्ष श्री. नितीन पाटील, माजी नगरसेवक श्री. दिलीप बोरसे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सी. डी. पाटील आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. सी. डी. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थी वाहतूक करतांना रिक्षा चालक व मालकांनी योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सुरक्षित विद्यार्थी वाहतूक करत असताना रिक्षेत मर्यादीत विद्यार्थी संख्या असावी. पालक व शाळा यांचा दुवा म्हणजे रिक्षा चालक आहेत.
रिक्षेवर विद्यार्थी वाहतूक करत असल्याचे लोगो, नाव ठळक अक्षरात लिहावे जेणेकरून अवजड वाहनधारक छोट्या वाहनांसाठी प्रथम जाण्यासाठी प्राधान्य देतील. रिक्षेत विदयार्थी यादी तसेच पालकांचे मोबाईल नंबर असलेली यादी असावी, प्रथमोपचार साहित्य रिक्षेत असणे बाबतचे मनोगत श्री. अविनाश राजपूत यांनी व्यक्त केले. सहविचार सभेचे सूत्रसंचालन व आभार श्री. महेंद्र माळी यांनी मानले. सभा यशस्वीतेसाठी श्री. रमेश शिरसाठ, श्री. संदीप पाटील, श्रीमती यशोदा पाटील, श्री. सतिष पाटील, श्री. सागर पवार यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा