Tuesday, 23 January 2018

स्वच्छता घोषवाक्य

स्वच्छता घोषवाक्य 

आर.  सी.  पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत स्वच्छ भारत सर्वेक्षण  अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्व  निर्माण होण्यासाठी  स्वच्छते संदर्भातील विविध घोषणा वदवून घेण्यात आल्या.  त्या खालील प्रमाणे.

१. कचराकुंडीचा वापर करू,  सुंदर परिसर निर्माण करू.
२. शौचालय असेल जेथे, खरी प्रतिष्ठा असेल तेथे.
३. स्वच्छ शाळा करा हातांनी, सुंदर गाणी गाऊ मुखांनी 

४. स्वच्छ सुंदर परिसर,  जीवन निरोगी निरंतर. 
५. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. 
६. स्वच्छता माणसाचे आत्मदर्शन घडविते. 
७. ज्याचे घरी सदैव स्वच्छता, नांदेल तेथे आरोग्य शुभता. 
८. परिसर स्वच्छ ठेवाल तर निरोगी व्हाल. 
९. घाण असेल घर, तर रोग येथील वर. 
१०. घर असतील साफ, तर सर्व गुन्हे माफ. 
११. रोज काढा केर, विषाणू करा ढेर. 
१२. गटार असेल पास, तर टिकून राहतील डास. 
१३. गाडगेबाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाना तंत्र. 


वृक्ष संवर्धन

वृक्ष संवर्धन योजना

आर.  सी.  पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने  स्वच्छतेचा कानमंत्र दिला जातो.  शाळेतील इयत्ता चौथी वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय आवारात लावण्यात आलेल्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी देण्यात येते.  'झाडे लावा झाडे व झाडे वाचवा' ही वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यास यामुळे मदत होते.  विद्यार्थी आपले परिसरात झाडे लावणे, झाडांना नियमितपणे पाणी देणे,  झाडांना खात टाकणे,  झाडांचे संरक्षण करणे इत्यादी विविध कामे विद्यार्थी अतिशय आनंदाने स्वतःहून करीत असतात. झाडे ही  आपले  मित्र आहेत ही भावना शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली दिसून येते. 

स्वच्छतेची प्रतिज्ञा

स्वच्छतेची प्रतिज्ञा

 आर.  सी.  पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत  स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत शाळेत शिक्षण घेणाऱ्या  इयत्ता बालवाडी ते चौथी वर्गात शिक्षण घेणाऱ्या सुमारे हजार विद्यार्थ्यांची स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी परिपाठाच्या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.  ती अशी . . . . . . . . .
मी शपथ घेतो की,  मी स्वतः  स्वच्छत्तेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईल.  दरवर्षी शंभर
तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेचा या संकल्पाला पूर्ण करीन. मी स्वतः
घाण करणार नाही आणि दुस-यालाही करू देणार नाही.  सर्वप्रथम मी स्वतःपासून,  माझ्या कुटुंबापासुन,  गल्ली
वस्तीपासून,  माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्य स्थळापासून या कामास सुरुवात करेल.  मला हे मान्य आहे
की जगामधील शहरे स्वच्छ आहेत त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करीत नाहीत व घाण
करू देत नाही.  या विचारांनी मी गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन. मी आज
जी शपथ घेत आहे ती आणखी शंभर लोकांनाही घ्यायला लावेल.  तेही माझ्यासारखे स्वच्छतेसाठी शंभर
तास देतील यासाठी मी प्रयत्न करेल. मला माहित आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे पाऊल संपूर्ण
देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल. 



स्वच्छता अॅप चे कार्य

स्वच्छता अॅप चे कार्य 

आर.  सी.  पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत शिरपूर शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छते संदर्भात जनजागृती निर्माण होण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी स्वच्छता ऍपचा वापर कसा करावा, अॅपमधील आपली तक्रार गॅलरी किंवा प्रत्यक्षस्थळी फोटो काढून कशी अपलोड करावी, त्या तक्रारीसाठी दिलेल्या सूचनांमधील योग्य सूचना कशी निवडावी व तक्रार अपलोड कशी करावी, पोस्ट केलेली तक्रार सोडवली गेली की अपूर्ण आहे अथवा काम चालू आहे हे कसे पाहावे,  तक्रार दूर झाली तर त्याला फिडबॅक कसा द्यावा, आपल्या परिसरात किंवा शहरात राहणाऱ्या नागरिकांनी टाकलेल्या तक्रारींना अभिप्राय कसा द्यावा या संदर्भात शाळेतील शिक्षक श्री. जगदीश धनगर,  श्री. महेंद्र माळी,  श्री.  गजेंद्र जाधव,  श्री.  गोपाळ न्हावी व श्री. संदीप चौधरी यांनी व्हिडिओ तयार केला व प्रभाग क्रमांक एकमधील चौका-चौकात प्रोजेक्टचा वापर करून मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला.  हा तयार केलेला व्हिडिओ परिसरातील तरुणांच्या व नागरिकांच्या मोबाइलमध्ये शेअर करण्यात आला. ऍपचा वापर करून परिसरात असलेल्या तक्रारी नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले.

स्वच्छतेची ज्योत पथनाट्य

स्वच्छतेची ज्योत पथनाट्य

स्वच्छतेची ज्योत पथनाट्य - आर.  सी.  पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत शिरपूर शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छते संदर्भात जनजागृती निर्माण होण्यासाठी शाळेतील चिमुकल्यांचे पथनाट्य तयार करून प्रभाग क्रमांक - १ मध्ये चौका चौकात पथनाटय़ाचे सादरीकरण करण्यात आले.  शिरपूर शहर स्वच्छ सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने सर्व नागरीक कशा प्रकारे सहकार्य करू शकतात हे पथनाट्यातून सादर करण्यात आले. ओला कचरा व सुका कचरा यांचे विलगीकरण करणे, घरातील ओल्या कचऱ्याचे विघटन करून घरच्या घरी खत तयार करता येऊ शकते इत्यादीबाबत पथनाट्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या पथनाट्यातून शिरपूर शहरात प्रभावीपणे जनजागृती केली. पथनाट्यासोबत 'स्वच्छतेकी  लहर चली' या नृत्यातूनही  नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. या पथनाटय़ामध्ये इयत्ता चौथीमधील बारा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



स्वच्छता सर्वेक्षण 2018

स्वच्छता सर्वेक्षण जनजागरुकता

स्वच्छता जनजागरुकता - आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत शिरपूर शहरातील नगरवासीयांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी प्रभाग क्रमांक - १  या परिसरात शाळेतील शिक्षकांनी घरोघरी भेटी दिल्या. परिसर स्वच्छ राखण्यासाठी घरातील कचरा कचरापेटीत टाकावा. घरात व परिसरात निर्माण होणाऱ्या  कचऱ्याचे विलगीकरण 'ओला कचरा व सुका कचरा' असे करून नगरपालिकेने दिलेल्या डस्टबीन मध्ये ओला कचरा टाकावा व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र डस्टबीन करावी व त्यांचा वापर करावा. यामुळे नगरपालिकेत कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोयीचे होईल. आपल्या घराचा परिसर 
'वापरा आणि फेका ऐवजी वापरा आणि पुन्हा वापरा' 
अशी आपण सर्वांनी सवय लावून घेतली तर परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल. प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर कमी करून त्याऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करावा इत्यादीबाबत नागरिकांमध्ये स्वच्छते संदर्भात जनजागृती करण्यात आली. तसेच नागरिकांच्या अडी अडचणींची नोंद घेऊन त्या सोडविण्याबाबत नगरपालिकेशी संपर्क साधण्यात आला.


संगणक लॅब

संगणक लॅब 

 आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत प्राथमिक विभागासाठी संस्थेकडून भव्य अशी संगणक लॅब तयार करून देण्यात आली. अत्याधुनिक सोई-सुविधा उपलब्ध असलेल्या लॅबचे १८   डिसेंबर २०१८ रोजी मा. मम्मीजी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.  संस्थेने शालेय विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे, विद्यार्थ्यांना संगणकाच्या सहाय्याने  परिणामकारक अध्यापन करण्यासाठी लॅब उपलब्ध करून दिली. या संगणक लॅब मध्ये  पस्तीस अद्ययावत कॉम्प्युटर, एल. सी. डी. प्रोजेक्टर व जलद असे इंटरनेट सुविधा अशी लॅब उभारली गेलेली आहे. 

आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेतील शिक्षक श्री. महेंद्र माळी व एच. आर.  पटेल मराठी कन्या प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेतील शिक्षक श्री. संजय पटेल यांनी स्वखर्चाने तयार केलेल्या डिजिटल वर्गाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. 
  

Monday, 22 January 2018

मम्मीजी क्रीडा महोत्सव

मम्मीजी क्रीडा महोत्सव

                                                   आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात प्राथमिक विभागासाठी दरवर्षी मा. मम्मीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य मम्मीजी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते.  आर. सी. पटेल प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेच्या भव्य मैदानावर १८ डिसेंबर वार सोमवार रोजी या महोत्सवाचे आयोजन केले गेले. इयत्ता पहिली व दुसरी या गटासाठी लिंबू चमचा, तीन पायांची शर्यत , गोणपाट शर्यत , बादलीत चेंडू टाकणे अशा प्रकारच्या विवधि स्पर्धा इयत्ता तिसरी व चौथी या गटासाठी शंभर मीटर धावणे , पन्नास मीटर लंग्‍डी , खो-खो,  कॅरम,  बुद्धिबळ , दोरीउड्या अश्या विविध स्पर्धा होत्या. आर. सी. पटेल पटेल संकुलातील सर्व प्राथमिक विभाग यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. या क्रीडा स्पर्धेचे काटेकोरपणे नियोजन केले गेले. प्रत्येक स्पर्धेसाठी स्वतंत्र अशी जागा आखलेली होती. या वर्षीच्या या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेने बॅडमिंटन , लिंबू चमचा , शंभर मीटर धावणे , कॅरम , बुद्धिबळ या स्पर्धांमध्ये बक्षीसे मिळवली. या मम्मीची क्रीडा महोत्सवात आर. सी.  पटेल संकुलातील सुमारे सोळाशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.  ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाची भूमिका बजावली.