मम्मीजी क्रीडा महोत्सव
मम्मीजी क्रीडा महोत्सव
आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात प्राथमिक विभागासाठी
दरवर्षी मा. मम्मीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य मम्मीजी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले
जाते. आर. सी. पटेल प्राथमिक शाळा शिरपूर या
शाळेच्या भव्य मैदानावर १८ डिसेंबर वार सोमवार रोजी या महोत्सवाचे आयोजन केले गेले. इयत्ता पहिली व दुसरी या गटासाठी
लिंबू चमचा, तीन पायांची शर्यत , गोणपाट शर्यत , बादलीत चेंडू टाकणे अशा प्रकारच्या विवधि स्पर्धा इयत्ता तिसरी व चौथी या गटासाठी शंभर मीटर धावणे , पन्नास मीटर लंग्डी
, खो-खो, कॅरम, बुद्धिबळ , दोरीउड्या अश्या विविध स्पर्धा होत्या. आर. सी. पटेल पटेल संकुलातील सर्व प्राथमिक विभाग यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. या क्रीडा स्पर्धेचे काटेकोरपणे नियोजन केले गेले. प्रत्येक स्पर्धेसाठी स्वतंत्र
अशी जागा आखलेली होती. या वर्षीच्या या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेने बॅडमिंटन , लिंबू
चमचा , शंभर मीटर धावणे , कॅरम , बुद्धिबळ या स्पर्धांमध्ये बक्षीसे मिळवली. या मम्मीची
क्रीडा महोत्सवात आर. सी. पटेल संकुलातील सुमारे
सोळाशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ही
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
यांनी मोलाची भूमिका बजावली.
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा