Tuesday, 23 January 2018

स्वच्छतेची ज्योत पथनाट्य

स्वच्छतेची ज्योत पथनाट्य

स्वच्छतेची ज्योत पथनाट्य - आर.  सी.  पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत शिरपूर शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छते संदर्भात जनजागृती निर्माण होण्यासाठी शाळेतील चिमुकल्यांचे पथनाट्य तयार करून प्रभाग क्रमांक - १ मध्ये चौका चौकात पथनाटय़ाचे सादरीकरण करण्यात आले.  शिरपूर शहर स्वच्छ सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने सर्व नागरीक कशा प्रकारे सहकार्य करू शकतात हे पथनाट्यातून सादर करण्यात आले. ओला कचरा व सुका कचरा यांचे विलगीकरण करणे, घरातील ओल्या कचऱ्याचे विघटन करून घरच्या घरी खत तयार करता येऊ शकते इत्यादीबाबत पथनाट्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या पथनाट्यातून शिरपूर शहरात प्रभावीपणे जनजागृती केली. पथनाट्यासोबत 'स्वच्छतेकी  लहर चली' या नृत्यातूनही  नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. या पथनाटय़ामध्ये इयत्ता चौथीमधील बारा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा