दप्तराचे ओझे आमची शाळा उपक्रम
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आम्ही खालील उपक्रम राबवतो.
- १) वेळापत्रक :- वेळापत्रकात जोडून तासिकांचे नियोजन केले जाते जेणेकरून कमी नोटबुक आणण्यास मदत होते.शिक्षक वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करतात
- २) ऑल इन वन नोटबुक :- वर्गकामासाठी सर्व विषयांची एक वही (रजिस्टर) केले जाते. यात विषयनिहाय भाग केले जातात.
- गृहकामासाठी देखील सर्व विषयांसाठी एकच वही(रजिस्टर) केले जाते.
- वर्गकामाच्या वह्या वर्गातच ठेवण्याची व्यवस्था केली आहे.फक्त गृहकामासाठी असलेले रजिस्टर विद्यार्थी दररोज ने -आण करतात.
- ३) जून्या पुस्तकांचा सदुपयोग:- या उपक्रमात शासनाने दिलेली मोफत पाठयपुस्तके शैक्षणिक वर्षाच्या शेवटी वर्गशिक्षकांनी गोळा करायची असतात व सदर पुस्तके वर्गातच कायमस्वरूपी बाकावर ठेवण्यात येतात.वर्षाच्या सुरुवातीला शासनाने दिलेली मोफ़त पाठयपुस्तके विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी कायमस्वरूपी दिलेली असतात.पाठयपुस्तकांची दप्तरातून ने-आण करण्यात येत नाही.अशा प्रकारे जुन्या पुस्तकांचा वर्गात अभ्यासासाठी उपयोग केला जातो.
- ४) एक बाक एक पुस्तक: एका बाकावर एक जुन्या पुस्तकाची व्यवस्था वर्गशिक्षक करून देतात. बाकावरील दोन विद्यार्थी एका पुस्तकाचा अध्ययनासाठी वापर करतात. यातून शेअरिंग भावना वाढीस लागते. ही पुस्तके आपल्याला वर्षभर हाताळायची आहेत त्यासाठी विद्यार्थी काळजीपूर्वक पुस्तकांची हाताळणी करतात.
- ५) वाटर बॅग व टिफिन कमी वजनाचे वारण्याबाबत शाळा कायम आग्रही असते.
- पालकांना पालक संभामधून दप्तराचे ओझे याबाबत मार्गदर्शन केले जाते.
- वाटर बॅगमध्ये अर्धा लीटर पाणी येईल एवढीच वाटर बॅग विद्यार्थी वापरतात.
- पोषण आहार शाळेतून मिळत असल्याने रिकामा डबा विद्यार्थी घेवून येतात.
- ६) निबंध, प्रयोग वही, नकाशा वही शाळेतच ठेवण्याची व्यवस्था प्रत्येक वर्गात केलेली आहे.
- ७) हलक्या वजनाचे दप्तर बाजारातून विकत घेण्याबाबत पालकांना सूचना केल्या जातात.
- दप्तर किमान पाच ,सहा वर्षे टिकले पाहिजे हा गैरसमज पालकसभांमधून दूर केला जातो.
- ८) दप्तर नियंत्रण कमिटी: प्रत्येक इयत्तेचा वर्गशिक्षक या कमिटीचा सदस्य असून शाळेचे मुख्याध्यापक या कमिटीचे अध्यक्ष आहेत. कमिटीतील निवडक सदस्य वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन करतात व त्याबाबत पालकांना व शिक्षकांना मार्गदर्शन करतात. तशा नोंदी ठेवल्या जातात.
- ९) शाळेत वजन काट्याची व्यवस्था:-शासनाच्या आदेशानुसार मुलांच्या वजनाच्या दहा टक्के वजन दप्तराचे असावे या बाबत शाळा उपरोक्त बाबींचे आग्रह पूवर्क हाताळणी करते.
- दप्तर नियंत्रण कमिटी वजनकाट्याचा नियमित वापर करतात. यामुळे दप्तराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
*मुख्याध्यापक*
*श्री सी.डी. पाटील*
*आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा, शिरपूर जि. धुळे.*
*मोबा:९८८१०३३३४८*
No comments:
Post a Comment
आपले विचार प्रकट करा