Saturday, 12 October 2019

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कापडी पिशव्यांचे वाटप

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कापडी पिशव्यांचे वाटप

शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर 
येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी वर्गात शिकणाऱ्या आठशे विद्यार्थ्यांना प्लास्टिक बंदीचे महत्त्व पटवून देण्यात आले व आपल्या घरापासून प्लास्टिक बंदी व्हावी म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून प्रेरणा लोक संचलित साधन केंद्र शिरपूर यांच्या मार्फत  कापडी पिशव्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. कापडी  पिशव्यांचा वापर करून प्लास्टिकला हद्दपार करुया आणि महाराष्ट्र निरोगी करण्यास हातभार लावण्याचे आवाहन नीता बाविस्कर यांनी केले. शाळेतील आठशे विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना बालवयातच प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम लक्षात यावेत.नेहमीच कापडी पिशवी वापराचा आग्रह धरला जावा या हेतूने सदर पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
       प्रेरणा लोक संचलित साधन केन्द्र शिरपूर येथील पर्यवेक्षिका नीता बाविस्कर, समन्वयक चेतन भोई, मुख्याध्यापक सी.डी. पाटील, महेंद्र माळी, संदीप चौधरी, गोपाल न्हावी,अविनाश राजपूत आदी पिशव्यांचे वाटप प्रसंगी उपस्थित होते.  मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी आपल्या मनोगतातून प्लास्टिकचे दुष्परिणाम समजावून सांगितले. शिरपूर वरवाडे नगर परिषदेने दिलेला शिरपूर स्वच्छतेचा वसा आपण सर्व  शिरपूरकर  पाळूया  व प्लास्टिक मुक्त शिरपूर करूया यासाठी राज्यशासनाचा हा अभिनव उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र जाधव यांनी केले. यशस्वीतेसाठी  शिक्षकेतर कर्मचारी संदीप पाटील, सागर पवार,यशोदा पाटील यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा