Saturday, 29 July 2017
Friday, 28 July 2017
Monday, 24 July 2017
Sunday, 23 July 2017
" Activity Based Learning Workshop"
शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक विभागातील पूर्व प्राथमिक व इयत्ता १ ली च्या शिक्षकांसाठी ABL कार्यशाळा आयोजित करण्यात आली .
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अध्यापन कसे करावे याबाबत श्रीमती ज्युलि थॉमस यांनी मार्गदशन केले. शिक्षकांनी स्वतः साहित्याची निर्मिती करून साहित्याचा वापर करावा. विद्यार्थ्यांना साहित्याची हाताळणी करू द्या असे ज्युलि थॉमस यांनी आपल्या मार्गदशनात सांगितले. पपेट शो, मॅजिक बॉक्स, ड्रामा, मॅजिक पेंटिंग, आदी बाबी कृतीयुक्त करून दाखवल्या.
कार्यशाळे प्रसंगी संस्थेचे संचालक श्री कमलकिशोर भंडारी,शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. नीता सोनवणे ,संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा,ज्युलि थॉमस आदी उपस्थित होते.
संस्थेतील १३० शिक्षकांनी सदर कार्यशाळेचा लाभ घेतला. डॉ. नीता सोनवणे यांनी कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले. श्री कमलकिशोर भंडारी यांनी शिक्षकांना उद्बोधन करतांना सांगितले की प्राथमिक शिक्षण हे संस्काराचे वय आहे.शिक्षक जे करतील ते मुले करतात. संस्काराच्या गोष्टी सांगितल्या जाव्यात.तसेच विद्यार्थ्यासाठी बक्षीस योजना जाहीर केली. यात प्रत्येक शाळेतील प्रथम तीन क्रमाकांना श्लोक स्पर्धेत अनुक्रमे ५०१, ३०१, २०१ रोख पारितोषिक देण्याचे जाहीर केले. शिक्षकांना ७०१ रु रोख बक्षीस देण्यात येईल. कार्यक्रम सूत्रसंचालन श्री महेंद्र माळी यांनी केले.
ABL Workshop |
Thursday, 20 July 2017
Wednesday, 19 July 2017
Tuesday, 18 July 2017
वर्ग सजावट
वर्ग सजावट स्पर्धा
आज इयत्ता 1 ली ते 4 थी वर्गांसाठी आयोजित, वर्ग सजावट स्पर्धा संपन्न झाली.
सदर स्पर्धेत सर्व शिक्षक बंधू ,भगिनींनी वर्गसजावटीसाठी जो प्रयत्न केलेला होता तो खरोखरच अतुलनीय आहे.
आपल्यातील निकोप स्पर्धा पाहून मनस्वी आंनद झाला. हे प्रयत्न विदयार्थ्यांच्या व शाळेच्या प्रगतीसाठी नक्कीच पोषक ठरणार आहेत.
कोणी काहीही म्हटले तरी मुले घर,परिसर,शाळा, वर्ग आदींच्या वातावरणातून न कळत शिकत असतात.
मानसशास्त्रच्या दृष्टीने आपल्या वर्गाचे असे आल्हाददायक वातावरण विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.
आपण या स्पर्धेच्या निमित्ताने जे सहकार्य केले त्याबद्दल आपला आभारी आहे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मुख्याध्यापक
( आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा, शिरपूर )
वर्ग सजावट स्पर्धा परीक्षण.
परीक्षक -
१. श्री. गणेश साळुंखे सर
२. श्री. महेंद्र परदेशी सर
वर्ग सजावट स्पर्धा बक्षीस वितरण.
गट क्र. १ (इयत्ता १ ली व २ री )
प्रथम - श्री. महेंद्र माळी सर ( इयत्ता १ ली )
द्वितीय - श्री. प्रकाश इशी सर ( इयत्ता २ री )
तृतीय - श्रीमती रेखा माळी मॅडम ( इयत्ता १ ली )
गट क्र. २ (इयत्ता ३ री व ४ थी )
प्रथम - श्री. सुभाष भिल सर ( इयत्ता ४ थी )
द्वितीय - श्री. गोपाल न्हावी सर ( इयत्ता ४ थी )
तृतीय - श्री. गजेंद्र जाधव सर ( इयत्ता ४ थी )
गट क्र. १ (इयत्ता १ ली व २ री )
प्रथम - श्री. महेंद्र माळी सर ( इयत्ता १ ली )
द्वितीय - श्री. प्रकाश इशी सर ( इयत्ता २ री )
तृतीय - श्रीमती रेखा माळी मॅडम ( इयत्ता १ ली )
गट क्र. २ (इयत्ता ३ री व ४ थी )
प्रथम - श्री. सुभाष भिल सर ( इयत्ता ४ थी )
द्वितीय - श्री. गोपाल न्हावी सर ( इयत्ता ४ थी )
तृतीय - श्री. गजेंद्र जाधव सर ( इयत्ता ४ थी )
Saturday, 15 July 2017
वर्गातील कृती
1. English Activity - Word, Sentence Making.
2. English Activity - Learn with Fun.
3. मराठी :- आम्ही संवाद करतो - आई व मुलगी यांच्यातील संवाद.
4. कला :- गीतगायन - मंगल देशा पवित्र देशा - इयत्ता ४ थी विद्यार्थी.
5. Birthday Celebration.
6. मराठी कविता - प्रत्यक्ष अनुभूती
Saturday, 8 July 2017
गुरु पौर्णिमा
गुरु पौर्णिमा
संपूर्ण भारतभर गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. फार पूर्वी अगदी पुरातन काळात आपल इथे आश्रम गुरुकुल पद्धत होती. गुरूंकडून विद्या घेण्यासाठी विद्यार्थी स्वत: गुरुकुलातच राहात असत. गुरूला पिता तर गुरुपत्नीला माता समजत. म्हणजे त्या शिष्यांच्या जीवनात गुरूंना एक अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान होते. अशी अनेक गुरुकुल त्या काळात होती आणि अनेक हुशार-पंडित-तत्त्वज्ञानी विद्यार्थी त्यातून घडले अन् जगाला आदर्श ठरले. युगानुयुगे ही गुरु-शिष्याची परंपरा सुरूच आहे. अगदी ज्ञानेश्वरांच्या काळातदेखील एवढा मोठा योगी चांगदेव पण त्यने लहानग्या मुक्ताईला गुरू मानले. इथे वयाचा संदर्भ जोडताच येत नाही. येतो प्रश्न तो ज्ञानाचा. व लहान असूनही जर जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं पांडित्य जर एखाद्यात असेल तर मग त्याला गुरूच म्हणावं लागेल. म्हणजेच जीवनाचं तत्त्वज्ञान ज्याच्याकडून शिकायला मिळतं तो म्हणजे गुरू.
Thursday, 6 July 2017
Subscribe to:
Posts (Atom)