Monday, 3 July 2017

वृक्ष दिंडी, ग्रंथ दिंडी सोहळा

ज्ञानरूपी झाडाची पाने

बहरती वने मने



"आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी , ग्रंथदिंडी व वृक्षा रोपण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन."
       दि.३ जुलै २०१७ वार:सोमवार रोजी आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा,शिरपूर शाखेत आषाढी एकादशी निमित्त वृक्षारोपण,ग्रंथदिंडी व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले.
     कार्यक्रम प्रसंगी मा. नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल ,गटशिक्षणाधिकारी श्री पी.झेड.रणदिवे,बांधकाम सभापती सौ.संगीताताई देवरे ,मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.उमेश शर्मा ,प्राचार्य पी.व्ही.पाटील,मुख्याध्यापक गणेश साळुंके, विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षा सौ जयश्रीबेन पटेल यांनी वृक्षदिंडी व  ग्रंथदिंडीचे पूजन करून औपचारिक उद्घाटन केले.
    गटशिक्षणाधिकारी पी.झेड रणदिवे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
    इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यानी वारकरी वेशभूषा साकारली.
 दिंडीत विद्यार्थ्यानी  वृक्ष लागवड व ग्रन्थ पूजन ,वाचन ,साक्षरतेचा संदेश दिला.
विठ्ठल रुक्मिणी यांची देखणी वेशभूषा विद्यार्थ्यानी साकारली.
   वृक्षदिंडीत ५०० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप चौधरी, गोपाल न्हावी,   गजेंद्र जाधव,एस.के.भिल,जगदीश सोलंकी,अविनाश राजपूत ,रमेश शिरसाठ ,जे.एम.धनगर ,पूनम सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.





No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा