Sunday, 23 July 2017

" Activity Based Learning Workshop"

                                    शिरपूर एज्युकेशन  सोसायटी संचलित प्राथमिक विभागातील पूर्व प्राथमिक व इयत्ता १ ली च्या शिक्षकांसाठी ABL कार्यशाळा आयोजित करण्यात आली .

                                      कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अध्यापन कसे करावे याबाबत श्रीमती ज्युलि थॉमस यांनी मार्गदशन केले. शिक्षकांनी स्वतः साहित्याची निर्मिती करून साहित्याचा वापर करावा. विद्यार्थ्यांना साहित्याची हाताळणी करू द्या असे ज्युलि थॉमस यांनी आपल्या मार्गदशनात सांगितले. पपेट शो, मॅजिक बॉक्स, ड्रामा, मॅजिक पेंटिंग, आदी बाबी कृतीयुक्त करून दाखवल्या.

                              कार्यशाळे प्रसंगी संस्थेचे संचालक श्री कमलकिशोर  भंडारी,शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. नीता सोनवणे ,संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा,ज्युलि थॉमस आदी उपस्थित होते.

                                         संस्थेतील १३० शिक्षकांनी   सदर कार्यशाळेचा लाभ घेतला. डॉ. नीता सोनवणे यांनी कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल  कौतुक केले. श्री कमलकिशोर भंडारी यांनी शिक्षकांना उद्बोधन करतांना सांगितले की प्राथमिक शिक्षण हे संस्काराचे वय आहे.शिक्षक जे करतील ते मुले करतात.  संस्काराच्या गोष्टी सांगितल्या जाव्यात.तसेच विद्यार्थ्यासाठी बक्षीस योजना जाहीर केली. यात प्रत्येक शाळेतील प्रथम तीन क्रमाकांना श्लोक स्पर्धेत अनुक्रमे ५०१, ३०१, २०१ रोख पारितोषिक देण्याचे जाहीर केले. शिक्षकांना ७०१ रु रोख बक्षीस देण्यात येईल.  कार्यक्रम सूत्रसंचालन श्री महेंद्र माळी यांनी केले.

ABL Workshop

No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा