शाळा बंद .....तरीही ऑनलाईन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून दि.१५ मार्च पासून
विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी कोव्हीड१९ या साथीच्या आजारात घराबाहेर न पडता घरीच
सुरक्षित राहावे. या कोरोना विषाणूला घरी थांबवूनच पळवून लावता येईल या निर्धाराने शिरपूर एज्युकेशन
सोसायटी संचलित आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेच्या वतीने लर्न फ्रॉम होम हा अभिनव उपक्रम
राबविण्यात येत आहे.
शाळेत इयत्ता पहिली ते सातवी वर्गाचे बाराशे विद्यार्थी प्रविष्ट आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांचे वर्ग निहाय व्हाट्सएप गृप मागील दोन वर्षांपासून पालकांशी नियमित संपर्कासाठी
उपलब्ध आहेत.
शाळेने ऑनलाईन अभ्यासमालिका सुरु केली आहे.
अभ्यासमालिकेचे आठवड्याचे विषय निहाय नियोजन शाळेने पालकांना पाठविले आहे.
त्या अनुषंगाने शिक्षक विद्यार्थ्यांना विविध विषयांचे वर्कशीट विद्यार्थ्यांना सोडवायला देतात.
विद्यार्थी पालकांच्या मदतीने शिक्षकांनी दिलेले गृहकाम नियमितपणे पूर्ण करतात. त्याचे फोटो देखील शिक्षकांना पाठवीत असतात.
विविध विषयांच्या ऑनलाईन टेस्टमॉझ सारख्या प्रश्नावली लिंक विद्यार्थ्यांना देण्यात येतात.टेस्टमॉझ
या ऑनलाईन प्रश्नावली लिंकला विद्यार्थी व पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यात आपण सोडवलेले प्रश्न
किती बरोबर आहेत याचा तात्काळ निकाल हाती येत असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.
व्हाट्सएपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची अभ्यास मालिका
नियमितपणे विद्यालयात सुरु आहे.
लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबू नये यासाठी शिक्षक दररोज ऑनलाईन अभ्यास देत
असतात.
ऑनलाईन अभ्यासमालिकेसाठी संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अमरीशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल,
कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल,उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या प्रेरणेतून
संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.उमेश शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे मुख्याध्यापक
सी.डी. पाटील,टेक्नोसॅव्ही शिक्षक महेंद्र माळी, संदीप चौधरी, गजेंद्र जाधव,अविनाश राजपूत,जितेंद्र करंके
आदी परिश्रम घेत आहेत.