Wednesday 27 May 2020

बाल आनंद मेळाव्याचे आयोजन.



बाल आनंद मेळाव्याचे यशस्वी आयोजन.


शिरपूर येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा,लेक शिकवा अभियान अंतर्गत बाल आनंद मेळाव्याचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले.  औपचारिक कार्यक्रम प्रसंगी नगरसेविका छायाताई ईशी,आशाताई बागुल, माहेश्वरी महिला मंडळ ट्रेझरर मीनाक्षी राठी,लायनेस क्लब सदस्या रत्नप्रभा सोनार,दिलीप बोरसे,साधन व्यक्ती मनोहर वाघ,मुख्याध्यापक गणेश साळुंके, महेंद्र परदेशी, सय्यद ईफतेखार, जगदीश धनगर, तुळशीराम पावरा,विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील आदी उपस्थित होते. बालिका दिनानिमित्त आयोजित इयत्ता पहिली ते चौथी वर्गासाठी नववर्ष भेटकार्ड स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम प्रसंगी गुणगौरव करण्यात आला. बाल आनंद मेळाव्यात शाळेतील नव्वदहून अधिक विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे लावलेले होते. विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान व्हावे, पैशांची देवाण घेवाण करता यावी या शुद्ध हेतूने विद्यालयाने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. तसेच पालकांनी सदैव आपल्या पाल्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थी शेपच्या कॅप घालून आपला पदार्थ दिमाखदारपणे विकतांना दिसून आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी  अविनाश राजपूत, संदीप चौधरी,रमेश शिरसाठ, जगदीश सोलंकी, गोपाल न्हावी,उज्ज्वला पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र माळी यांनी केले आभार गजेंद्र जाधव यांनी मानले.

No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा