Wednesday 27 May 2020

बालिका दिन

बालिका दिनानिमित्त रांगोळी व भेटकार्ड स्पर्धेचे आयोजन.

शिरपूर येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रांगोळी व भेटकार्ड स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले.  औपचारिक कार्यक्रम व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय वरसाळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील,परीक्षक स्वाती जगदाळे,शीतल पाटील,महेंद्र माळी,उज्ज्वला पाटील,पूनम सूर्यवंशी, शुभांगी बाविस्कर आदी उपस्थित होते.
बालिका दिनानिमित्त इयत्ता पहिली ते चौथी वर्गासाठी नववर्ष भेटकार्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भेटकार्ड स्पर्धेत शाळेतील एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी आकर्षक भेटकार्ड बनविले असल्याचे परीक्षकांनी मत नोंदवले.इयत्ता निहाय प्रथम दोन क्रमांक काढण्यात आले.शाळेतून चार उत्कृष्ट भेटकार्डांची परीक्षकांनी निवड केली. यात
चौधरी दिवेश (४थी गुलाब)
धनगर दर्शन भरत (४थी मोगरा)
पाटील गौरव दिनेश (१ ली जास्वंद)
भोई कल्पेश सुरेश (२री मोगरा.) 
सदर विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. रांगोळी स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. इयत्ता तिसरी व चौथी असे दोन गट करण्यात आले. स्पर्धा परीक्षण सौ.स्वाती जगदाळे व श्रीमती शितल पाटील यांनी केले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याबद्दल  जगदीश सोलंकी यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी रमेश शिरसाठ, अविनाश राजपूत, संदीप चौधरी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोपाल न्हावी यांनी केले आभार गजेंद्र जाधव यांनी मानले.

No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा