Wednesday 27 May 2020

तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण व संस्थेतील शिक्षकांचे स्वनिर्मित शैक्षणिक साहित्याचे भव्य प्रदर्शन

शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचे स्वनिर्मित शैक्षणिक साहित्याचे भव्य प्रदर्शन दि.२० जानेवारी सोमवार रोजी संस्थेच्या मेंनबिल्डींग येथील इमारतींत सकाळी ९ वाजता संपन्न होणार आहे.

आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलातील  पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक अशा शेहेचाळीस शाखांमधील सुमारे चारशे शिक्षक सदर प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.  उद्घाटन प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव,माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे,प्राथमिक शिक्षणाधिकारी मनिष पवार,सचिव प्रभाकरराव चव्हाण, विश्वस्त सी.बी.अग्रवाल,विश्वस्त चिंतनभाई पटेल, आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट उपाध्यक्ष तपनभाई पटेल, तज्ञ संचालक कमलकिशोर भंडारी,विश्वस्त बबनलाल अग्रवाल, बालाजी संस्थानचे उपाध्यक्ष गोपाल भंडारी,मर्चंट बँक चेअरमन प्रसन्न जैन,शिरपूर पीपल्स बँक चेअरमन योगेश भंडारी,विश्वस्त फिरोजखा काझी,गटशिक्षणाधिकारी एस.सी.पवार, शिक्षणविस्तार अधिकारी पी.झेड.रणदिवे, डॉ. नीता सोनवणे, जी.पी.कुमावत आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिक्षकांनी सतत आपल्या अध्यापनात नवनवीन शैक्षणिक साहित्याचा वापर करावा,शिक्षक नेहमीच सर्जनशील असावा,शिक्षकांच्या अंगी असलेले सुप्त कलागुणांना वाव मिळावा  या माध्यमातून संस्था दरवर्षी भव्य साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करीत असते. संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शिक्षक स्वनिर्मित साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमात  आर.सी.पटेल प्राथमिक शाळा, शिरपूर तर्फे आयोजित तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. दि.१४ सप्टेंबर वार शनिवार रोजी मा.शालेय शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तालुक्यातील मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमाच्या शाळेसह सी.बी.एस. ई. , आश्रम,जिल्हा परिषदेच्या शाळांनी सहभाग नोंदवला होता. तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेतील नऊ गटांतील यशस्वी चाळीस विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. शैक्षणिक साहित्य प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील शाळांनी, शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा