Wednesday 27 May 2020

शालेय पोषण आहार तपासणी

शिरपूर शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना शासनाच्या मध्यवर्ती स्वयंपाक गृह योजनेच्या माध्यमातून शालेय पोषण आहार शहरातील सर्वच शाळांना बंद डब्यातून पोहोचवण्यात येतो. सदर योजना सन जून एकोणविस पासून राज्यातील शहरी भागातील शाळांना लागू झाली असल्याने योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे किंवा नाही याची तपासणी करणे कामी राज्यस्तरीय कमिटी सदस्यांनी शिरपुरातील शाळांची पाहणी केली.  आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा मेंनबिल्डींग शिरपूर येथील पोषण आहार तपासणी करण्यात आला. यात त्यांनी पोषण आहार दर्जा,गुणवत्ता, विद्यार्थी संख्या प्रमाण, स्वच्छता,विद्यार्थी बैठक व्यवस्था, विद्यार्थी वैयक्तिक स्वच्छता,विद्यार्थी आरोग्य तपासणी झाली आहे का ?, शालेय परिसर स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची सोय, शापोआ अभिलेख तपासणी आदी बाबी कटाक्षाने पाहिल्या. पोषण आहार पोहचविण्यासाठी येत असलेल्या गाडीचे तेथील कर्मचारी यांची विचारपूस केली. यात प्रत्येक कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दिले आहे का? प्रत्येक कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे का ? याची पडताळणी समितीने केली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यात दररोजच्या आहारात कोणकोणत्या मेणूंचा समावेश असतो.पोषण आहार दररोज गरम दिला जातो का? आपणास कोणता मेनू विशेष आवडतो.अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी दिलखुलास पणे दिली. भेटी प्रसंगी शालेय पोषण आहार तपासणी पथक शिक्षण संचालनालय, पुणे येथील शालेय पोषण आहार अधीक्षक प्रमोद सोनार,शिरपूर पंचायत समिती शालेय पोषण आहार अधीक्षक पी.झेड.रणदिवे,शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.उमेश शर्मा,साधन व्यक्ती मनोहर वाघ,आकाश देडे,प्राचार्य पी.व्ही.पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील आदी उपस्थित होते. भेटी दरम्यान प्रमोद सोनार यांनी स्वतः शालेय पोषण आहाराची चव घेतली. पदार्थ गरम असून चविष्ट असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

आपले विचार प्रकट करा