Sunday, 5 August 2018

वाढदिवस पुस्तक भेट उपक्रम

वाढदिवस पुस्तक भेट उपक्रम

आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शालेत शाळेचे विद्यार्थी शिक्षक आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करतात. प्रत्येक विद्यार्थी किंवा शिक्षक आपल्या वाढदिवसाला कमीत कमी एक जास्तीत जास्त पंधरा ते वीस पुस्तके शाळेच्या ग्रंथालयाला भेट देतात. या पुस्तक भेट योजनेचे स्वागत पालकांनी केलेले आहे. मुलाच्या वाढदिवसाला पालक स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेला पुस्तक भेट देताना दिसतात. विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच वाचन संस्कृती रुजवली जावी यादृष्टीने शाळेने सदर पुस्तक भेट योजना सुरू केली आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक सी. डी. पाटील शिक्षकांच्या संकल्पनेतून पुस्तक भेट योजना विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी पालक शिक्षक या  तीनही घटकांचा समन्वय साधला जात आहे.

शिक्षक गरिमा शिबिर

शिक्षक गरिमा शिबिर 

आज दिनांक २२/०७/२०१८वार रविवार रोजी शिरपूर शहरातील अग्रसेन भवन येथेशिक्षक गरिमा शिबिराचेआयोजन आर. सी. पटेल शैक्षणिक संकुल शिरपूर गायत्री परिवार शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले.  या शिक्षक गरिमा शिबिरात संस्थेतील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी हरिद्वार येथील शांतीकुंज चे प्रतिनिधी श्री. डॉ. अशोकजी ढोके, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजगोपालजी भंडारी, अनिल भाऊ अग्रवाल, कमल भाऊ भंडारी शिंदे काका इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अशोकचे डोके यांनी भारतातील गुरूंच्या परंपरेचे पालन आपण करावे नव्या युगाचा भारत घडवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतातील प्रसिद्ध गुरु-शिष्य यांची उदारणे देऊन शिक्षकांना समाजात मानाचे स्थान कसे आहे ते पटवून दिले. या संस्थेमार्फतभारतीय संस्कृतीया परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बसवण्याचे आवाहन श्री अशोकजी ढोके यांनी शिक्षकांना केले. या वेळी संस्थेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"आषाढी एकादशी दिंडी व पालखी सोहळा’’

Saturday Activity
. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज दिनांक २१/०७/२०१८ वार शनिवार रोजी Saturday Activity  अंतर्गतआषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी इयत्ता बालवाडी वर्गातील चिमुकल्यांनी वारकऱयांच्या वेशात शालेय परिसरात टाळ वाजवून विठ्ठलाचे नामस्मरण करत दिंडी काढली. विठ्ठलाच्या भक्तीमय वातावरणामध्ये विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन गेले होते विठ्ठलाचे नामस्मरण मोठ्या आनंदाने एका तालासुरात करत होतेविठ्ठलाच्या दिंडी सोबतच वृक्षदिंडी ग्रंथदिंडी यांचेही आयोजन करण्यात आले. वृक्ष संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी विविध प्रकारच्या वृक्षा संदर्भातल्या घोषणा विद्यार्थ्यांकडून वदवून घेण्यात आल्या गणेश कॉलनी परिसरातील रॅलीत विद्यार्थ्यांनी या घोषणा देऊन परिसर दुमदुमून सोडला. शालेय आवारात विद्यार्थ्यांकडून लहान रोपांची लागवड करण्यात आली.

x

शालेय क्रीडा स्पर्धा

Saturday Activity
आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत दिनांक १४/०७/२०१८ वार शनिवार रोजी  Saturday Activity  अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली दुसरी आणि इयत्ता तिसरी चौथी असे दोन गट  करण्यात येऊन विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यात लहान गटासाठी लिंबू चमचा शर्यत, बादलीत चेंडू टाकणे, तीन पायांची शर्यत मोठय़ा गटासाठी दोरीउड्या, गोणपाट शर्यत, शंभर मीटर धावणे या प्रकारच्या स्पर्धा घेतल्या गेल्या. प्रत्येक क्रीडा प्रकारातून मुले मुली अशा गटातून उत्कृष्ट खेळ खेळणारे खेळाडू निवडण्यात आले. या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक श्री सुभाष भिल यांचे वर्ग शिक्षकांना मोलाचे सहकार्य लाभले.
x