Wednesday, 27 May 2020

ऑनलाईन अध्ययन अध्यापन

शाळा बंद .....तरीही ऑनलाईन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून दि.१५ मार्च पासून 
विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी कोव्हीड१९ या साथीच्या आजारात घराबाहेर न पडता घरीच 
सुरक्षित राहावे. या कोरोना विषाणूला घरी थांबवूनच पळवून लावता येईल या निर्धाराने शिरपूर एज्युकेशन 
सोसायटी संचलित आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेच्या वतीने लर्न फ्रॉम होम हा अभिनव उपक्रम 
राबविण्यात येत आहे.
     शाळेत इयत्ता पहिली ते सातवी वर्गाचे बाराशे विद्यार्थी प्रविष्ट आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांचे वर्ग निहाय व्हाट्सएप गृप मागील दोन वर्षांपासून पालकांशी नियमित संपर्कासाठी 
उपलब्ध आहेत.
शाळेने ऑनलाईन अभ्यासमालिका सुरु केली आहे.
अभ्यासमालिकेचे आठवड्याचे विषय निहाय नियोजन शाळेने पालकांना पाठविले आहे.
त्या अनुषंगाने शिक्षक विद्यार्थ्यांना विविध विषयांचे वर्कशीट विद्यार्थ्यांना सोडवायला देतात.
विद्यार्थी पालकांच्या मदतीने शिक्षकांनी दिलेले गृहकाम नियमितपणे पूर्ण करतात. त्याचे फोटो देखील शिक्षकांना पाठवीत असतात.
विविध विषयांच्या ऑनलाईन टेस्टमॉझ सारख्या प्रश्नावली लिंक विद्यार्थ्यांना देण्यात येतात.टेस्टमॉझ
 या ऑनलाईन प्रश्नावली लिंकला विद्यार्थी व पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यात आपण सोडवलेले प्रश्न
 किती बरोबर आहेत याचा तात्काळ निकाल हाती येत असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.
व्हाट्सएपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची अभ्यास मालिका 
नियमितपणे विद्यालयात सुरु आहे.
     लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबू नये यासाठी शिक्षक दररोज  ऑनलाईन अभ्यास देत 
असतात.
ऑनलाईन अभ्यासमालिकेसाठी संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अमरीशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल,
कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल,उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या प्रेरणेतून 
संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.उमेश शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे मुख्याध्यापक 
सी.डी. पाटील,टेक्नोसॅव्ही शिक्षक महेंद्र माळी, संदीप चौधरी, गजेंद्र जाधव,अविनाश राजपूत,जितेंद्र करंके
 आदी परिश्रम घेत आहेत.

शालेय पोषण आहार लाभार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांना तांदूळ वाटप

शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून इयत्ता पहिली ते सातवीच्या बाराशे विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाक गृहातील शिल्लक तांदूळ समप्रमाणात वाटप करण्यात आला. यावेळी शासनाने निर्धारित केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत वर्गनिहाय फक्त पाच पालकांना शाळेत प्रवेश देण्यात आला. प्रत्येक पालकांना स्वतंत्रपणे प्लास्टिक पिशवीत पॅकिंगमध्ये सोशियल डिस्टन्सचे पालन करीत तांदूळ वाटप करण्यात आला. कोव्हीड १९ बाबत पालकांमध्ये जागृती दिसून आली.पालकांनी तोंडाला मास्क लावलेले होते. शालेय पोषण आहार अधीक्षक पी.झेड.रणदिवे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण विभाग प्रमुख मोहन चौधरी, साधन व्यक्ती मनोहर वाघ,आकाश देडे यांचे सहकार्य लाभले. विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील व व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या उपस्थितीत तांदूळ वाटप करण्यात आला. यावेळी इयत्ता पहिली वर्गाचे वर्गशिक्षक आर.डी. माळी, एम.आर.सोनवणे,बी.बी.काटोले, महेंद्र माळी,वंदना सोनवणे, स्मिता साळुंखे, प्रकाश ईशी,योगेश बागुल, गजेंद्र जाधव, अविनाश राजपूत, संदीप चौधरी आदी उपस्थित होते. शिक्षकेतर कर्मचारी संदीप पाटील, यशोदा पाटील,सतिष पाटील,सागर पवार यांनी परिश्रम घेतले.

सांस्कृतिक महोत्सव २०२०

शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा, शिरपूर शाखेच्या सांस्कृतिक महोत्सवाचे शानदार उदघाटन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी सत्तारदादा पावरा पंचायत समिती सभापती, चंद्रकांत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, गोपाल भंडारी उपाध्यक्ष बालाजी संस्थान,डॉ. उमेश शर्मा मुख्यकार्यकारी अधिकारी, श्री नाटूसिंग गिरासे मुख्य वित्त अधिकारी,संगीताताई देवरे नगरसेविका, आशाताई बागुल नगरसेविका, जी.पी.कुमावत शिक्षण विस्तार अधिकारी, अनिल बाविस्कर केंद्रप्रमुख, अरुणाताई कोळी सरपंच खामखेडा, संजय वरसाळे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,प्रवीण माळी पालक प्रतिनिधी, मनोहर वाघ साधन व्यक्ती पंचायत समिती, किशोर माळी दैनिक देशदूत वार्ताहर,ज्ञानेश्वर थोरात वार्ताहर दैनिक जनशक्ती,प्रशांत चौधरी, वार्ताहर दैनिक दिव्यमराठी,अमोल सोनवणे सिनेट सदस्य केबीसी विद्यापीठ, मुख्याध्यापक गणेश साळुंके,बी.आर.महाजन, आर.टी. भोई, ईश्वर पाटील, के.टी.जाधव, गोपाल पाटील,महेंद्रसिंग परदेशी,ज्युलि थॉमस, एलिझाबेथ जानवे, आर.व्ही.सूर्यवंशी,आर.बी.खोंडे,पी.एस. गहिवरे,रितेश कुलकर्णी, परीक्षक तुषार माळी,सुनिल गोपाळ विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील आदी उपस्थित होते.  प्रास्ताविक मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी सादर केले. भारतीय सण आणि उत्सव या थीम नुसार विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाचे सादरीकरण केले. पक्षी वाचवा,स्त्री भ्रूण हत्या,प्लास्टिक बंदी,लेक वाचवा,लेक शिकवा आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी संदेशपर नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. शाळेतील एकवीस विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले. भारतीय सण आणि उत्सव थीममध्ये सौर वर्षानुसार विविध सण व उत्सवांचे वैशिष्ट्य सादरीकरण करण्यात आले. सदर कार्यक्रमात बालवाडी ते चौथी वर्गातील सहाशे विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  महेंद्र माळी व गजेंद्र जाधव यांनी केले. आभार अविनाश राजपूत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण व संस्थेतील शिक्षकांचे स्वनिर्मित शैक्षणिक साहित्याचे भव्य प्रदर्शन

शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचे स्वनिर्मित शैक्षणिक साहित्याचे भव्य प्रदर्शन दि.२० जानेवारी सोमवार रोजी संस्थेच्या मेंनबिल्डींग येथील इमारतींत सकाळी ९ वाजता संपन्न होणार आहे.

आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलातील  पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक अशा शेहेचाळीस शाखांमधील सुमारे चारशे शिक्षक सदर प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.  उद्घाटन प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव,माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे,प्राथमिक शिक्षणाधिकारी मनिष पवार,सचिव प्रभाकरराव चव्हाण, विश्वस्त सी.बी.अग्रवाल,विश्वस्त चिंतनभाई पटेल, आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट उपाध्यक्ष तपनभाई पटेल, तज्ञ संचालक कमलकिशोर भंडारी,विश्वस्त बबनलाल अग्रवाल, बालाजी संस्थानचे उपाध्यक्ष गोपाल भंडारी,मर्चंट बँक चेअरमन प्रसन्न जैन,शिरपूर पीपल्स बँक चेअरमन योगेश भंडारी,विश्वस्त फिरोजखा काझी,गटशिक्षणाधिकारी एस.सी.पवार, शिक्षणविस्तार अधिकारी पी.झेड.रणदिवे, डॉ. नीता सोनवणे, जी.पी.कुमावत आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिक्षकांनी सतत आपल्या अध्यापनात नवनवीन शैक्षणिक साहित्याचा वापर करावा,शिक्षक नेहमीच सर्जनशील असावा,शिक्षकांच्या अंगी असलेले सुप्त कलागुणांना वाव मिळावा  या माध्यमातून संस्था दरवर्षी भव्य साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करीत असते. संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शिक्षक स्वनिर्मित साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमात  आर.सी.पटेल प्राथमिक शाळा, शिरपूर तर्फे आयोजित तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. दि.१४ सप्टेंबर वार शनिवार रोजी मा.शालेय शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तालुक्यातील मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमाच्या शाळेसह सी.बी.एस. ई. , आश्रम,जिल्हा परिषदेच्या शाळांनी सहभाग नोंदवला होता. तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेतील नऊ गटांतील यशस्वी चाळीस विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. शैक्षणिक साहित्य प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील शाळांनी, शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा यांनी केले आहे.

बाल आनंद मेळाव्याचे आयोजन.



बाल आनंद मेळाव्याचे यशस्वी आयोजन.


शिरपूर येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा,लेक शिकवा अभियान अंतर्गत बाल आनंद मेळाव्याचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले.  औपचारिक कार्यक्रम प्रसंगी नगरसेविका छायाताई ईशी,आशाताई बागुल, माहेश्वरी महिला मंडळ ट्रेझरर मीनाक्षी राठी,लायनेस क्लब सदस्या रत्नप्रभा सोनार,दिलीप बोरसे,साधन व्यक्ती मनोहर वाघ,मुख्याध्यापक गणेश साळुंके, महेंद्र परदेशी, सय्यद ईफतेखार, जगदीश धनगर, तुळशीराम पावरा,विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील आदी उपस्थित होते. बालिका दिनानिमित्त आयोजित इयत्ता पहिली ते चौथी वर्गासाठी नववर्ष भेटकार्ड स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम प्रसंगी गुणगौरव करण्यात आला. बाल आनंद मेळाव्यात शाळेतील नव्वदहून अधिक विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे लावलेले होते. विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान व्हावे, पैशांची देवाण घेवाण करता यावी या शुद्ध हेतूने विद्यालयाने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. तसेच पालकांनी सदैव आपल्या पाल्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थी शेपच्या कॅप घालून आपला पदार्थ दिमाखदारपणे विकतांना दिसून आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी  अविनाश राजपूत, संदीप चौधरी,रमेश शिरसाठ, जगदीश सोलंकी, गोपाल न्हावी,उज्ज्वला पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र माळी यांनी केले आभार गजेंद्र जाधव यांनी मानले.

बालिका दिन

बालिका दिनानिमित्त रांगोळी व भेटकार्ड स्पर्धेचे आयोजन.

शिरपूर येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रांगोळी व भेटकार्ड स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले.  औपचारिक कार्यक्रम व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय वरसाळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील,परीक्षक स्वाती जगदाळे,शीतल पाटील,महेंद्र माळी,उज्ज्वला पाटील,पूनम सूर्यवंशी, शुभांगी बाविस्कर आदी उपस्थित होते.
बालिका दिनानिमित्त इयत्ता पहिली ते चौथी वर्गासाठी नववर्ष भेटकार्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भेटकार्ड स्पर्धेत शाळेतील एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी आकर्षक भेटकार्ड बनविले असल्याचे परीक्षकांनी मत नोंदवले.इयत्ता निहाय प्रथम दोन क्रमांक काढण्यात आले.शाळेतून चार उत्कृष्ट भेटकार्डांची परीक्षकांनी निवड केली. यात
चौधरी दिवेश (४थी गुलाब)
धनगर दर्शन भरत (४थी मोगरा)
पाटील गौरव दिनेश (१ ली जास्वंद)
भोई कल्पेश सुरेश (२री मोगरा.) 
सदर विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. रांगोळी स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. इयत्ता तिसरी व चौथी असे दोन गट करण्यात आले. स्पर्धा परीक्षण सौ.स्वाती जगदाळे व श्रीमती शितल पाटील यांनी केले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याबद्दल  जगदीश सोलंकी यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी रमेश शिरसाठ, अविनाश राजपूत, संदीप चौधरी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोपाल न्हावी यांनी केले आभार गजेंद्र जाधव यांनी मानले.

मा.मम्मीजी क्रीडा महोत्सव २०१९

मा.मम्मीजी क्रीडा महोत्सव २०१९

शालेय स्तर क्रीडा स्पर्धा

शिरपूर येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत शालेय स्तरावरील   क्रीडा स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. १८ डिसेंबर वार:बुधवार रोजी मा.मम्मीजी (हेमंतबेन आर.पटेल) यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक विभागाचा क्रीडा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शालेय स्तरावर तीन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. बालवाडी,इयत्ता पहिली व दुसरी,तिसरी व चौथी या गटात लिंबू चमचा, पोत्यांची शर्यत, तीन पायांची शर्यत,खो,खो,कॅरम,बुद्धीबळ, बॅडमिंटन, कबड्डी, रस्सीखेच अशा मैदानी व इनडोअर खेळांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक स्पर्धेतील प्रथम दोन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मम्मीजी क्रीडा महोत्सवात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. शालेय स्तर क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील, क्रीडा प्रशिक्षक राकेश बोरसे,भूषण चव्हाण, स्वप्निल मोरे,रमेश शिरसाठ आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी अर्चना जोशी,संगिता चव्हाण, शुभांगी बाविस्कर, वैशाली बारी पूनम सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र माळी यांनी केले आभार जगदीश सोलंकी यांनी मानले.

शैक्षणिक साहित्य निर्मिती व विकसन

शैक्षणिक साहित्य निर्मिती व विकसन


शालेय पोषण आहार तपासणी

शिरपूर शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना शासनाच्या मध्यवर्ती स्वयंपाक गृह योजनेच्या माध्यमातून शालेय पोषण आहार शहरातील सर्वच शाळांना बंद डब्यातून पोहोचवण्यात येतो. सदर योजना सन जून एकोणविस पासून राज्यातील शहरी भागातील शाळांना लागू झाली असल्याने योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे किंवा नाही याची तपासणी करणे कामी राज्यस्तरीय कमिटी सदस्यांनी शिरपुरातील शाळांची पाहणी केली.  आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा मेंनबिल्डींग शिरपूर येथील पोषण आहार तपासणी करण्यात आला. यात त्यांनी पोषण आहार दर्जा,गुणवत्ता, विद्यार्थी संख्या प्रमाण, स्वच्छता,विद्यार्थी बैठक व्यवस्था, विद्यार्थी वैयक्तिक स्वच्छता,विद्यार्थी आरोग्य तपासणी झाली आहे का ?, शालेय परिसर स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची सोय, शापोआ अभिलेख तपासणी आदी बाबी कटाक्षाने पाहिल्या. पोषण आहार पोहचविण्यासाठी येत असलेल्या गाडीचे तेथील कर्मचारी यांची विचारपूस केली. यात प्रत्येक कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दिले आहे का? प्रत्येक कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे का ? याची पडताळणी समितीने केली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यात दररोजच्या आहारात कोणकोणत्या मेणूंचा समावेश असतो.पोषण आहार दररोज गरम दिला जातो का? आपणास कोणता मेनू विशेष आवडतो.अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी दिलखुलास पणे दिली. भेटी प्रसंगी शालेय पोषण आहार तपासणी पथक शिक्षण संचालनालय, पुणे येथील शालेय पोषण आहार अधीक्षक प्रमोद सोनार,शिरपूर पंचायत समिती शालेय पोषण आहार अधीक्षक पी.झेड.रणदिवे,शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.उमेश शर्मा,साधन व्यक्ती मनोहर वाघ,आकाश देडे,प्राचार्य पी.व्ही.पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील आदी उपस्थित होते. भेटी दरम्यान प्रमोद सोनार यांनी स्वतः शालेय पोषण आहाराची चव घेतली. पदार्थ गरम असून चविष्ट असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले.

Saturday, 12 October 2019

शालेय पोषण आहार - सेंट्रल किचन आढावा

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सेंट्रल किचन आढावा बैठकीचे आयोजन.


शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर, येथे पंचायत समितीच्या माध्यमातून शहरातील सेंट्रल किचन लाभार्थी शाळांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
सभेप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी तथा अधीक्षक शालेय पोषण आहार योजना पंचायत समिती शिरपूर पी.झेड.रणदिवे, साधनव्यक्ती मनोहर वाघ,आकाश देडे,प्राचार्य पी.व्ही.पाटील, मुख्याध्यापक गणेश साळुंके,विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांच्यासह विविध शाखांचे मुख्याध्यापक,अरिहंत गृह उद्योग व नंद नमकीन, चिराई देवी बचत गटांचे संचालक आदी उपस्थित होते.
आढावा बैठकीत शहरातील सदतीस सेंट्रल किचन लाभार्थी शाळांच्या मुख्याध्यापकांना पी.झेड.रणदिवे यांनी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनात शहरातील सदतीस शाळांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून पोषण आहार पुरवठा जुलै महिन्यापासून करण्यात येत आहे.या पद्धतीने पोषण आहाराचा दर्जा उत्तम राखला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सेंट्रल किचन राबवणारी राज्यातील दुसरी नगरपालिका असल्याचे सभेप्रसंगी नमुद करण्यात आले.
शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला पोषण आहार व पूरक आहार देण्यात यावा.
असे आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले.
साधन व्यक्ती मनोहर वाघ यांनी शालेय पोषण आहार दप्तर नेहमीच अद्ययावत असावे.तांदूळ मागणी गरजेनुसार करण्यात यावी.पोषण आहार नमुना दररोज दोन स्वतंत्र डब्यात काढण्यात यावा. याबद्दल मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापकांच्या वतीने आदर्श शाळा मुख्याध्यापिका वंदना रघुवंशी,आदर्श शिक्षक हरीलाल जुलवाणी,महेंद्र भिकन माळी या शिक्षकांचा गौरव पी.झेड.रणदिवे यांच्याहस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन महेंद्र माळी यांनी केले.
आभार गजेंद्र जाधव यांनी मानले.
सभा यशस्वीतेसाठी संदीप पाटील, सागर पवार यशोदा पाटील यांनी परिश्रम घेतले.

मतदान जनजागृती रॅलीचे यशस्वी आयोजन

मतदान जनजागृती रॅलीचे यशस्वी आयोजन



शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेत मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅली उद्घाटन प्रसंगी  विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील,गजेंद्र जाधव, संदीप चौधरी, गोपाल न्हावी,जगदीश धनगर, तुळशिराम पावरा आदी उपस्थित होते.
शासन आदेशानुसार  नागरिकांना मतदानाबाबत जागरूक करून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध शालेय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे यात मतदान जनजागृती रॅली,एक पत्र मतदानासाठी, पालक मेळावा, पथनाट्य,निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शाळेने सुभाष कॉलनी, आदर्शनगर,गायत्री मंदिर,पोस्ट ऑफिस परिसरात मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन केले.
मतदान करणे आपला हक्क असून लोकशाही मजबुतीसाठी नागरिकांना आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन इयत्ता चौथी वर्गातील विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून केले. परिसरात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा देऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. रॅली यशस्वीतेसाठी जगदीश सोलंकी,महेंद्र माळी,संदीप पाटील, सागर पवार यांनी परिश्रम घेतले.

तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा निकाल

शिरपूर शहरातील  आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेत  आ. अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.ह्या  स्पर्धा दरवर्षी आयोजन करण्यात येते.  तालुक्यातील प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली.यात जिल्हा परिषद, नगरपालिका, खाजगी प्राथमिक, आश्रम शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळांसोबतच सीबीएसई स्कुल अशा अठ्ठेचाळीस शाळेतील ३७५  विद्यार्थ्यांना  सहभाग घेतला. 

   प्राथमिक विभागासाठी स्पर्धा आयोजित असून स्पर्धा नऊ गटातून संपन्न झाली.
यासाठी माध्यमिक शाळांमधील तीस इंग्रजी विषय शिक्षकांची स्पर्धा परीक्षकांची जबाबदारी पार पाडली.
     प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत आहे.तालुक्यातील विविध शाळांमधून चांगला  प्रतिसाद मिळत असतो.ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी वक्तृत्वासाठी संस्थेने व्यासपीठ उपलब्ध करून दिले  आहे.

   तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल,उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या प्रेरणेने व संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असते.

    
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,संचालक कमलकिशोर भंडारी, नगरसेविका संगिता देवरे,शिक्षण विस्तार अधिकारी जी.पी.कुमावत,केंद्रप्रमुख अनिल बाविस्कर,मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.उमेश शर्मा,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय वरसाळे, प्राचार्य पी.व्ही.पाटील,प्राचार्य आर.बी.पाटील, मुख्याध्यापक गणेश साळुंखे,महेंद्र परदेशी,आर.टी. भोई, गोपाल पाटील,सय्यद इफ्तेखार,रवींद्र खोंडे विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील आदी उपस्थित होते.     कार्यक्रमात राजेश्वरी डिगराळे  व फाल्गुनी चौधरी  या विद्यार्थ्यांचा  वाढदिवस साजरा करण्यात आला.

 बक्षीस मिळविणारे विद्यार्थी व शाळा 
*शहरी विभाग लहान गट (इ. पहिली व दुसरी)
प्रथम-  जान्हवी दिलबर बेहेरे , एच आर पटेल कन्या प्राथमिक 
द्वितीय-  गायत्री कैलास सोनवणे ,एच आर पटेल कन्या प्राथमिक 
तृतीय  दर्शील शिवराज बाविस्कर   आर सी पटेल मराठी प्राथमिक शाळा 
उत्तेजनार्थ चैतन्य हरिष बेहरे आर सी पटेल प्राथमिक शाळा  
*शहरी विभाग मोठा गट (इ. तिसरी व चौथी)*
प्रथम ऋतुजा दीपक चौधरी  आर सी पटेल मराठी प्राथमिक शाळा 
द्वितीय  प्रांजल अमोल सोनवणे आर सी पटेल मराठी प्राथमिक शाळा 
तृतीय हेमांगी राजेंद्र गिरासे  आर सी पटेल हुडको वाल्मिकनगर  
उत्तेजनार्थ अनुज सुनील शिरसाठ  आर सी पटेल प्राथमिक शाळा 
*ग्रामीण विभाग लहान गट (इयत्ता पहिली व दुसरी*)
प्रथम खाटीक आझमीना अरिफ खाटीक  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळ.
 द्वितीय भावेश रवींद्र गुजर आर सी पटेल प्राथमिक शाळा खर्दे 
तृतीय दिवेश विठोबा माळी   अार सी पटेल प्राथमिक शाळा खर्दे  
उत्तेजनार्थ  देवराज शरद पाटील आर सी पटेल प्राथमिक शाळा खर्दे  
*ग्रामीण विभाग मोठा गट (इयत्ता तिसरी व चौथी)*
प्रथम  जान्हवी भैया पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तऱ्हाडी.
द्वितीय आयुश्री ईश्वर धनगर  आर सी पटेल प्राथमिक शाळा भोरखेडा 
तृतीय बंजारा प्रदीप सुखराम बंजारा  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बभळाज 
उत्तेजनार्थ हर्षदा महेंद्रसिंग राजपूत  आर.सी पटेल प्राथमिक शाळा खर्दे 
*आश्रमशाळा लहान गट (पहिली व दुसरी)*
प्रथम राधिका रेपला पावरा  आर.सी पटेल आश्रमशाळा निमझरी 
द्वितीय  रणजीला सुरसिंग पावरा  आर.सी पटेल आश्रमशाळा वाघाडी 
तृतीय पवन सुरेश पावरा  आर.सी.पटेल आश्रमशाळा निमझरी 
उत्तेजनार्थ निकेश लालसिंग पावरा  आर.सी पटेल आश्रमशाळा शिरपूर 
*आश्रमशाळा मोठा गट (तिसरी व चौथी)*
प्रथम खुशी सुनील पावरा  आर.सी पटेल आश्रम शाळा वाघाडी 
द्वितीय अंकुश मका पावरा आर.सी पटेल आश्रमशाळा असली 
तृतीय  हिमेश दिनेश पावरा आर.सी पटेल आश्रमशाळा असली 
उत्तेजनार्थ रोहित बाबुलाल पावरा  आर.सी पटेल आश्रमशाळा वाघाडी 
*इंग्रजी माध्यम लहान गट (पहिली व दुसरी)* 
प्रथम मनस्वी शर्मा इंटरनेशनल स्कूल दहिवद 
द्वितीय  अद्विता रवींद्र पाटील   ए. आर पटेल सीबीएससी स्कूल 
तृतीय  देवांश हितेंद्र देसले  ए .अार पटेल सीबीएसी स्कूल 
उत्तेजनार्थ  स्वरा राजू पाटील केव्हीटीआर सीबीएससी स्कूल 
*इंग्रजी माध्यम मोठा गट (तिसरी व चौथी)*
प्रथम दिक्षिता राहुल साळुंखे ए आर पटेल सीबीएससी स्कूल  
द्वितीय अक्षरा मनोज कुलकर्णी एम आर पटेल इंग्लिश मिडियम स्कूल 
तृतीय  अर्णव नितीन पाटील  आर सी पटेल इंग्लिश मेडियम स्कूल 
उत्तेजनार्थ तन्मय नरेश देवरे एम आर पटेल इंग्लिश मिडियम स्कूल 
*खुला गट (पहिली ते चौथी)* 
प्रथम  हुनर महेश डेंबरानी ए आर पटेल सीबीएससी स्कूल 
द्वितीय जान्हवी कैलास सोनवणे  एच आर पटेल कन्या प्राथमिक शाळा  
तृतीय  हंसिका प्रमोद भोपे व श्रावणी कमलाकर पाटीलए आर पटेल सीबीएससी स्कूल 
उत्तेजनार्थ संस्कृती किरण पाटील आर.सी पटेल इंग्लिश मिडियम स्कूल

तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा

दि १४ सप्टेंबर रोजी मा. आ.श्री अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.

शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेत 
दि १४ सप्टेंबर वार:शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मेंनबिल्डींग येथील नवीन ईमारतीच्य हॉलमध्ये मा. आ.श्री अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा संपन्न होणार आहे.
दरवर्षी तालुकास्तरीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात येत असून यात तालुक्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, खाजगी प्राथमिक, आश्रम शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळांसोबतच सी.बी.एस.ई.शाळेतील विद्यार्थी सहभागी होतात. प्राथमिक विभागासाठी स्पर्धा आयोजित असून स्पर्धा नऊ गटातून संपन्न होत असते. शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळांमधील पस्तीस इंग्रजी विषय शिक्षकांची स्पर्धा परीक्षणसाठी मदत होणार आहे. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत आहे.तालुक्यातील विविध शाळांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल,उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या प्रेरणेने व संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असते. ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी वक्तृत्वासाठी संस्थेने मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी सदर स्पर्धा प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी केले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कापडी पिशव्यांचे वाटप

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कापडी पिशव्यांचे वाटप

शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर 
येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी वर्गात शिकणाऱ्या आठशे विद्यार्थ्यांना प्लास्टिक बंदीचे महत्त्व पटवून देण्यात आले व आपल्या घरापासून प्लास्टिक बंदी व्हावी म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून प्रेरणा लोक संचलित साधन केंद्र शिरपूर यांच्या मार्फत  कापडी पिशव्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. कापडी  पिशव्यांचा वापर करून प्लास्टिकला हद्दपार करुया आणि महाराष्ट्र निरोगी करण्यास हातभार लावण्याचे आवाहन नीता बाविस्कर यांनी केले. शाळेतील आठशे विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना बालवयातच प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम लक्षात यावेत.नेहमीच कापडी पिशवी वापराचा आग्रह धरला जावा या हेतूने सदर पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
       प्रेरणा लोक संचलित साधन केन्द्र शिरपूर येथील पर्यवेक्षिका नीता बाविस्कर, समन्वयक चेतन भोई, मुख्याध्यापक सी.डी. पाटील, महेंद्र माळी, संदीप चौधरी, गोपाल न्हावी,अविनाश राजपूत आदी पिशव्यांचे वाटप प्रसंगी उपस्थित होते.  मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी आपल्या मनोगतातून प्लास्टिकचे दुष्परिणाम समजावून सांगितले. शिरपूर वरवाडे नगर परिषदेने दिलेला शिरपूर स्वच्छतेचा वसा आपण सर्व  शिरपूरकर  पाळूया  व प्लास्टिक मुक्त शिरपूर करूया यासाठी राज्यशासनाचा हा अभिनव उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र जाधव यांनी केले. यशस्वीतेसाठी  शिक्षकेतर कर्मचारी संदीप पाटील, सागर पवार,यशोदा पाटील यांनी परिश्रम घेतले.

शिक्षक दिन

शिक्षक दिन

शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी जीईओजीत कंपनीचे एरिया मॅनेजर माजी विद्यार्थी प्रशांत टोकशा, विद्यालयाचे  मुख्याध्यापक सी.डी. पाटील,जगदीश सोलंकी, रमेश शिरसाठ, उज्ज्वला पाटील, संदीप चौधरी, गोपाल न्हावी,अविनाश राजपूत,जगदीश धनगर,पुनम सूर्यवंशी आदी उपस्थित होते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून इयत्ता तिसरी व चौथी वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभागाची संधी निर्माण करण्यासाठी शाळा व्यवस्थापन नेहमीच आग्रहाची भूमिका घेत असते. 
मुख्याध्यापकांची भूमिका कुश अभय जाधव याने साकारली.
माजी विद्यार्थी प्रशांत टोकशा यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या आठवणी जागृत केल्या. शिक्षक दिनी माझ्या हातून माझ्या गुरुजनांचा सत्कार होत असल्याने मी भारावून गेलो आहे.इतर विद्यार्थ्यांप्रमाणे समोर बसून कार्यक्रम पाहणारा मुलगा स्टेजवर बसून माझं बालपण आठवत असल्याचे मत त्याने व्यक्त केले. मुलांनी अभ्यासाबरोबर कला, क्रीडा व खेळाकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.  मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकाची विद्यार्थ्यांप्रती भूमिका काय असते, शिक्षक विद्यार्थ्यांना कशाप्रकारे संस्काराचे धडे देतात, शिक्षकांच्या वर्गातील प्रत्येक कृती विद्यार्थी हितासाठी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र जाधव यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेंद्र माळी,योगेश बागुल, जितेंद्र करंके, तुळशीराम पावरा यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी संदीप पाटील, सागर पवार,यशोदा पाटील,सतिष पाटील यांनी परिश्रम घेतले.

श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला

श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला

शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्साहात साजरी करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय वरसाळे,विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष दत्तू माळी,मुख्याध्यापक सी.डी. पाटील, गजेंद्र जाधव,महेंद्र माळी,संदीप चौधरी, गोपाल न्हावी,रमेश शिरसाठ,उज्ज्वला पाटील, आदी उपस्थित होते. विद्यालयातील उपशिक्षिका मोहिनी सोनवणे यांनी श्रीकृष्ण यांच्या जीवनातील विविध प्रसंगाचे वर्णन आपल्या मनोगतातून व्यक्त केले.श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला बाबत विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. विद्यालयातील इयत्ता बालवाडी  वर्गातील विद्यार्थ्यांसाठी श्रीकृष्ण व राधा या वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश राजपूत यांनी केले.
आभार जगदीश सोलंकी यांनी मानले. यशस्वीतेसाठी वंदना सोनवणे, बबिता काटोले,स्मिता साळुंखे, जगदीश धनगर, पूनम सूर्यवंशी,अर्चना जोशी, शुभांगी बाविस्कर, वैशाली बारी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी संदीप पाटील, सागर पवार,यशोदा पाटील यांनी परिश्रम घेतले.

दप्तराचे ओझे आमची शाळा उपक्रम

दप्तराचे ओझे आमची शाळा उपक्रम
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आम्ही खालील उपक्रम राबवतो.
  • १) वेळापत्रक :- वेळापत्रकात जोडून तासिकांचे नियोजन केले जाते जेणेकरून कमी नोटबुक आणण्यास मदत होते.शिक्षक  वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करतात
  • २) ऑल इन वन नोटबुक :- वर्गकामासाठी सर्व विषयांची एक वही (रजिस्टर) केले जाते. यात विषयनिहाय भाग केले जातात. 
  • गृहकामासाठी देखील सर्व विषयांसाठी एकच वही(रजिस्टर) केले जाते.
  • वर्गकामाच्या वह्या वर्गातच ठेवण्याची व्यवस्था केली आहे.फक्त गृहकामासाठी असलेले रजिस्टर विद्यार्थी दररोज ने -आण करतात.
  • ३) जून्या पुस्तकांचा सदुपयोग:- या उपक्रमात शासनाने दिलेली मोफत पाठयपुस्तके शैक्षणिक वर्षाच्या शेवटी वर्गशिक्षकांनी गोळा करायची असतात व सदर पुस्तके वर्गातच कायमस्वरूपी बाकावर ठेवण्यात येतात.वर्षाच्या सुरुवातीला शासनाने दिलेली मोफ़त पाठयपुस्तके विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी कायमस्वरूपी दिलेली असतात.पाठयपुस्तकांची दप्तरातून ने-आण करण्यात येत नाही.अशा प्रकारे जुन्या पुस्तकांचा वर्गात अभ्यासासाठी उपयोग केला जातो.
  • ४) एक बाक एक पुस्तक: एका बाकावर एक जुन्या पुस्तकाची व्यवस्था वर्गशिक्षक करून देतात. बाकावरील दोन विद्यार्थी एका पुस्तकाचा अध्ययनासाठी वापर करतात. यातून शेअरिंग भावना वाढीस लागते. ही पुस्तके आपल्याला वर्षभर हाताळायची आहेत त्यासाठी विद्यार्थी काळजीपूर्वक पुस्तकांची हाताळणी करतात.
  • ५) वाटर बॅग व टिफिन कमी वजनाचे वारण्याबाबत शाळा कायम आग्रही असते.
  • पालकांना पालक संभामधून दप्तराचे ओझे याबाबत मार्गदर्शन केले जाते.
  • वाटर बॅगमध्ये अर्धा लीटर पाणी येईल एवढीच वाटर बॅग विद्यार्थी वापरतात.
  • पोषण आहार शाळेतून मिळत असल्याने रिकामा डबा विद्यार्थी घेवून येतात.
  • ६) निबंध, प्रयोग वही, नकाशा वही शाळेतच ठेवण्याची व्यवस्था प्रत्येक वर्गात केलेली आहे.
  • ७) हलक्या वजनाचे दप्तर बाजारातून विकत घेण्याबाबत पालकांना सूचना केल्या जातात.
  • दप्तर किमान पाच ,सहा वर्षे टिकले पाहिजे हा गैरसमज पालकसभांमधून दूर केला जातो.
  • ८) दप्तर नियंत्रण कमिटी: प्रत्येक इयत्तेचा वर्गशिक्षक या कमिटीचा सदस्य असून शाळेचे मुख्याध्यापक या कमिटीचे अध्यक्ष आहेत. कमिटीतील निवडक सदस्य वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन करतात व त्याबाबत पालकांना व शिक्षकांना मार्गदर्शन करतात. तशा नोंदी ठेवल्या जातात.
  • ९) शाळेत वजन काट्याची व्यवस्था:-शासनाच्या आदेशानुसार मुलांच्या वजनाच्या दहा टक्के वजन दप्तराचे असावे या बाबत शाळा उपरोक्त बाबींचे आग्रह पूवर्क हाताळणी करते.
  • दप्तर नियंत्रण कमिटी वजनकाट्याचा नियमित वापर करतात. यामुळे दप्तराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
       *मुख्याध्यापक*
*श्री सी.डी. पाटील*
*आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा, शिरपूर जि. धुळे.* 
*मोबा:९८८१०३३३४८*